Saturday, March 29, 2025
Homeब्रेकिंग न्यूजदै. 'देशदूत' आयोजित 'पंचवटी अनेक्स प्रॉपर्टी एक्स्पो'ला वाढता प्रतिसाद

दै. ‘देशदूत’ आयोजित ‘पंचवटी अनेक्स प्रॉपर्टी एक्स्पो’ला वाढता प्रतिसाद

उद्या प्रॉपर्टी एक्स्पोचा शेवटचा दिवस

नाशिक । प्रतिनिधी Nashik

युवकांपासून व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांपासून महिलांपर्यंत विविध श्रेणीतील नागरिकांच्या भेटीचा ओघ हे ‘देशदूत पंचवटी अनेक्स (जत्रा चौफुली) प्रॉपर्टी एक्स्पो’च्या दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. शनिवारची (दि.29) सायंकाळ स्वप्नातील घराच्या शोधात घालवून नागरिकांनी ‘वीकएण्ड’चा पुरेपूर आनंद घेतला.

- Advertisement -

दै.’देशदूत’ आयोजित ‘प्रॉपर्टी एक्स्पो’त सहभागी बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प मध्यमवर्गीयांपासून उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वच घटकांना सुयोग्य पर्याय उपलब्ध करून देत आहेत. नागरिक सहकुटुंब गर्दी करीत आहेत. दुपारी 2 वाजेपासून सुरू झालेला गर्दीचा ओघ रात्री ९ पर्यंत सुरू होता.

स्टॉलधारकांकडून प्रदर्शनात आलेल्या कुटुंबीयांना पूरक माहिती देण्यात आली. प्रदर्शनाचे आयोजन रामलीला बँक्वेट हॉल, जत्रा चौफुली, नांदूर नाका लिंक रोड, आडगाव शिवार पंचवटी येथे करण्यात आले आहे. पंचवटीच्या नवीन आडगाव नाका, जत्रा चौफुली, रासबिहारी रोड, कोणार्क नगर, बळी मंदिर, छत्रपती संभाजी नगर नाका परिसरातील घरांचे पर्याय प्रत्यक्ष डोळ्यांत साठवता यावेत या उद्देशाने काही सहभागी बांधकाम व्यावसायिकांनी प्रत्यक्ष ‘साईट व्हिजिट’ची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

काल आलेल्या अनेक ग्राहकांनी आज प्रत्यक्ष साईटवर पाहणी केली. तसेच आज आलेले ग्राहक उद्या साईट व्हिजिट करणार आहेत. अनेक जण घर घेण्यास अनुकूल आहेत. उद्या (दि.30) प्रदर्शनाचा समारोप होत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी दुपारी 1 ते रात्री ९ या वेळेत प्रदर्शनाला भेट देऊन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घर व शॉपचे स्वप्न साकार करावे असे आवाहन आयोजकांनी केले.

प्रदर्शन यशस्वीतेसाठी मार्केटिंग ऑफिसर भगवंत जाधव, समीर पाराशरे, आनंद कदम, प्रशांत अहिरे, विशाल जमधडे, यांनी परिश्रम घेतले.

मान्यवरांच्या भेटी
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापती कल्पना चुंभळे यांनी एक्स्पोला भेट देऊन स्टॉल धारकांसोबत संवाद साधला. जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी सभापती कल्पना चुंभळे यांचा सत्कार केला.

नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा समावेश
प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये पार्कसाईड, ललित रुंगटा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ए. सी जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कीस्टोन कन्स्ट्रक्शन, फोर्थ डायमेंशन प्रॉपर्टीज, दक्ष रिअल्टी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ग्रोवर्थ रिअल सोल्यूशन्स प्रा. लि., पुष्प्रीत रिअल्टी, सोमविजय कन्स्ट्रक्शन, ओंकारेश्वर इन्फ्राटेक, कनकलक्ष्मी डेव्हलपर्स, विहान ग्रुप बिल्डर – लँड डेव्हलपर, शेठ रिअल्टी, क्रिश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स, समर्थ ग्रुप, सचिन पी. बागड इंजिनिअर्स-बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नेरकर प्रॉपर्टीज, आशापुरी कन्स्ट्रक्शन्स, हरी ओम ग्रुप हे नामांकित बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

प्रामाणिक कार्यावर विश्वास, पण आरोप सिद्ध झाल्यास संन्यास – देविदास पिंगळे

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माझ्यावर लावलेले सर्व आरोप निराधार असून, त्यापैकी एक जरी सिद्ध झाला तरी मी राजकारणातून संन्यास घेईन,...