Monday, April 21, 2025
Homeक्रीडाBCCI Annual Contract : बीसीसीआयकडून वार्षिक करारामधील खेळाडूंची यादी जाहीर, पाहा संपूर्ण...

BCCI Annual Contract : बीसीसीआयकडून वार्षिक करारामधील खेळाडूंची यादी जाहीर, पाहा संपूर्ण लिस्ट

मुंबई | Mumbai

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुरूष संघाच्या केंद्रीय वार्षिक कराराची (१ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५) यादी जाहीर केली आहे. यात रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना ए प्लस श्रेणीत कायम ठेवण्यात आले आहे.  या यादीमध्ये इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यासह टीम इंडियाचा (Team India) स्टार युवा खेळाडू अभिषेक शर्मा याचाही समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

सदर यादीत श्रेयस अय्यरला (Shreyas Lyer) बी प्लस श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. तसेच ईशान किशनचा समावेश सी श्रेणीत करण्यात आला आहे. याआधी बीसीसीआयच्या केंद्रीय करारामधून श्रेयस अय्यर आणि ईशान किशनला काढून टाकण्यात आले होते. तर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी त्यांना अजूनही त्याच श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, हा करार (Contracts) १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत असणार आहे. या करारमध्ये खेळाडूंना ठरलेल्या ग्रेडनुसार मानधन मिळते. यामधील ए+ ग्रेडला वर्षाला ७ कोटी, ए ग्रेडला ५ कोटी, बी ग्रेडला ३ कोटी आणि सी ग्रेडमध्ये येणाऱ्या खेळाडूंना (Players) १ कोटी असे मानधन मिळते.

बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेली केंद्रीय करार यादी खालीलप्रमाणे

ग्रेड A+ : रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा
ग्रेड A : मोहम्मद सिराज, के.एल. राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, ऋषभ पंत
ग्रेड B : सुर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर
ग्रेड C : रिंकू सिंह, तिलक वर्मा, शिवम दुबे, रवी बिश्नोइ, ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृ्ष्णा, ध्रुव जुरेल, रजत पाटीदार, सर्फराज खान, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, इशान किशन, आकाश दीप, वरूण चक्रवर्ती, हर्षित राणा

 

 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सातपीर दर्गाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik मनपाच्या वतीने शहरातील द्वारका भागातील (Dwarka Area) हजरत सातपीर बाबा दर्गा अतिक्रमणावर झालेली कारवाई बेकायदेशीर आहे. दर्ग्याचे पुरावे आमच्याकडे असल्याचा...