Monday, July 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजWomen's T20 World Cup : ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा उंचावला विश्वचषक; अंतिम सामन्यात इंग्लंडचा...

Women’s T20 World Cup : ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा उंचावला विश्वचषक; अंतिम सामन्यात इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर रविवारी (५ जुलै) खेळवल्या गेलेल्या महिला टी-२० विश्वचषक (Women’s T20 World Cup) स्पर्धेच्या थरारक अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) इंग्लंडचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासाह (Won) ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा विश्वचषक जिंकून महिला क्रिकेट विश्वावर आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. यापूर्वी इंग्लंडने अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करत इतिहास रचला होता, मात्र यावेळी त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यात इंग्लंड संघाला अपयश आले.

- Advertisement -
ग्लंडची खराब सुरुवात, ब्रंटचे अर्धशतक

सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक (टॉस) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर ऐमी जोन्स अवघ्या ६ धावांवर आणि डॅनी व्हॅट हॉज ८ धावांवर बाद होऊन माघारी परतल्या. सुरुवातीच्या धक्क्यांनंतर नॅट सेवियर ब्रंट हिने धैर्याने फलंदाजी करत ५८ धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. तिला ऐलिस कॅपसी (२३ धावा) आणि फ्रेया केम्प (२८ धावा) यांनी मोलाची साथ दिली. यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे इंग्लंडला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. ऑस्ट्रेलियाकडून उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत सोफी मोलीनेक्स, लूसी हॅमिल्टन आणि ऐनाबेल सदरलेंड यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

मूनी आणि लीच फील्डची शतकी भागीदारी

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवातही संथ झाली. सलामीवीर जॉर्जिया वोल अवघ्या ९ धावांवर बाद झाली. मात्र, त्यानंतर अनुभवी बेथ मूनी आणि फीबी लीच फील्ड यांनी मैदानावर वादळ आणले. या जोडीने अवघ्या ६७ चेंडूंमध्ये १०० धावांची विक्रमी भागीदारी रचून इंग्लंडच्या हाताधून सामना पूर्णपणे हिरावून घेतला. बेथ मूनीने ६४ धावांची मॅचविनिंग खेळी केली, तर लीच फील्डने ४८ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

१८ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा विजय

ही जोडी बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या ऐलिस पेरी (१३ धावा) आणि ऐशले गार्डनर (३ धावा) यांनी १८ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संघाचा विजय सुनिश्चित केला आणि ऑस्ट्रेलियाच्या गोटात एकच जल्लोष सुरू झाला.

बेथ मूनी ठरली ‘स्टार’

संपूर्ण स्पर्धेत आणि अंतिम सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या बेथ मूनीला ‘सामनावीर’ (प्लेअर ऑफ द मॅच) आणि ‘मालिकावीर’ (प्लेअर ऑफ द सिरीज) या दोन्ही पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेतूनही विसर्ग वाढविला; लाभक्षेत्रात समाधान

0
अकोले | Akole उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने भंडारदरा खालोखाल महत्वपूर्ण असणारे निळवंडे धरणही शुक्रवारी भरले. पाण्याची आवक वाढतच असल्याने अखेर निळवंडे धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी काल...