Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला टी-२०...

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला टी-२० सामना

मुंबई | Mumbai

भारताने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशा फरकाने जिंकल्यानंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका (India and South Africa) यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका रंगणार आहे. मालिकेमधील पहिला टी-२० सामना ९ डिसेंबरला कटकमधील बाराबाती मैदानावर खेळण्यात येईल. एकदिवसीय मालिकेनंतर आता टी-२० मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

- Advertisement -

भारतीय संघाची धुरा सूर्य कुमार यादवकडे (Suryakumar Yadav) तर दक्षिण आफ्रिका संघाचे कर्णधारपद अॅडम मार्करमकडे असणार आहे, विशेष म्हणजे भारत आणि श्रीलंका संघांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे.

YouTube video player

दक्षिण आफ्रिका आणि भारत टी-२० क्रिकेट सामन्यात ३२ वेळा एकमेकांसमोर आले असून, भारतीय संघाने (Team India) १८ तर दक्षिण आफ्रिकाने ११ सामन्यात विजय संपादन केला आहे. १ सामना पावसामु‌ळे रद्द करण्यात आला आहे. भारत आणि दक्षिण आफिका संघांमध्ये भारतामध्ये ३ टी-२० मालिका खेळविण्यात आल्या असून, २ मालिका बरोबरीत सुटल्या आहेत. तर भारतीय क्रिकेट संघाने १ मालिका जिंकली आहे.

७ खेळाडू बाहेर

एकदिवसीय मालिकेच्या तुलनेत, पहिल्या टी-२० मधून ७ खेळाडू बाहेर असतील. यामध्ये रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, के. एल. राहुल, रवींद्र जडेजा आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंनी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली, परंतु ते टी-२० मालिकेचा भाग नाहीत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे उपकर्णधार शुभमन गिल तंदुरुस्त आहे. पहिल्या टी-२० मध्ये तो अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करेल. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याही संघात परतेल.

भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जीतेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, वाशिंगटन सुंदर.

दक्षिण आफ्रिका संघ

एडेन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, टोनी डि जोरजी, रीजा हेंड्रिक्स, डेविड मिलर, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, मार्को यानसन, क्रॅिटन डी कॉक (यष्टीरक्षक), डोनोवन फरेरा (यष्टीरक्षक), ट्रिस्टन स्टास, ओटनिल बार्टमैन, केशव महाराज, छेना माफाका, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्जे

ताज्या बातम्या

Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगरचे वातावरण तापले! इम्तियाज जलील यांच्या गाडीवर...

0
छत्रपती संभाजीनगर । Chhatrapati Sambhajinagar महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असतानाच शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयएमचे (MIM) प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज...