Wednesday, October 7, 2026
Homeक्राईमIND vs WI : आजपासून भारत-वेस्ट इंडिज टी-२० मालिका; लखनऊमध्ये रंगणार पहिला...

IND vs WI : आजपासून भारत-वेस्ट इंडिज टी-२० मालिका; लखनऊमध्ये रंगणार पहिला सामना, कुणाला मिळणार संधी?

लखनऊ | Lucknow

भारत आणि वेस्ट इंडिज संघात ( India and West Indies) आजपासून (दि.०६ ऑक्टोबर) ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना लखनऊ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता खेळवला जाईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर आणि डिजिटल स्ट्रीमिंगवर प्रसारित केले जाणार आहे.

- Advertisement -

भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) सोपवण्यात आली असून, वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व शाई होप करणार आहे. दरम्यान, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याने न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेच्या तयारीसाठी आणि लाल चेंडूच्या सरावावर लक्ष केंद्रित करण्यासाठी टी-२० मालिकेतून माघार घेतली आहे.

त्याच्या जागी नमन धीरला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत ३-० असा निर्भेळ विजय मिळवत भारताने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मालिका जिंकली होती, ज्यामुळे सध्या भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.

आकडेवारी आणि इतिहास

दोन्ही संघात आतापर्यंत ३१ टी-२० सामने झाले असून यात भारतीय संघ २०-१० अशा फरकाने आघाडीवर आहे. लखनऊच्या मैदानावर भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेले सर्व ३ सामने जिंकत आपले वर्चस्व कायम राखले आहे. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील द्विपक्षीय मालिका व इतर सामने मिळून १२ सामने झाले असून यात भारत ९-३ ने आघाडीवर आहे. याआधी २०१८, २०१९ आणि २०२२ मध्ये भारतात झालेल्या टी-२० मालिकांमध्ये भारतीय संघानेच बाजी मारली होती. विंडिजविरुद्धच्या या मालिकेतही आपली विजयी घोडदौड कायम राखण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-२० संघ

भारताचा टी-२० संघ – श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन, संजू सॅमसन (डब्ल्यूके), शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयंक यादव, नमन धीर

वेस्ट इंडिजचा टी-२० संघ – शाई होप, ज्वेल अँड्र्यू, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, अकेल होसेन, शामर जोसेफ, गुडाकेश मोती, कीमो पॉल, कामिल पूरन, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, रोमॅरियो शेफर्ड, शामर स्प्रिंगर, अमीर जांगू

ताज्या बातम्या

महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे...

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीसाठी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ७ ऑक्टोबर पर्यंत तब्बल ३७ लाख ९३ हजार ५१ अर्ज प्राप्त झाल्याची...