Tuesday, January 6, 2026
Homeक्रीडाT20 World Cup 2026 : भारत-पाक सामना १५ फेब्रुवारीला; आयसीसी टी-२० विश्वचषक...

T20 World Cup 2026 : भारत-पाक सामना १५ फेब्रुवारीला; आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

रोहित शर्मा स्पर्धेचा ब्रँड ॲम्बेसेडर

मुंबई | Mumbai

भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघांच्या (India and Shri Lanka) संयुक्त यजमानपदाखाली आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे (ICC T20 World Cup 2026) आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत होणार असून, स्पर्धेमध्ये ५५ सामने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या २० संघांचे कर्णधार विश्वचषक स्पर्धेच्या चमचमत्या चषकावर आपले नाव कोरून इतिहास रचण्यासाठी मैदानावर उतरणार आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा स्पर्धेचा ब्रँड ॲम्बेसेडर असणार आहे.

- Advertisement -

इटली प्रथमच स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. साखळी फेरी आटोपल्यानंतर सुपर ८ लढती होणार आहेत.त्यानंतर उपांत्य फेरी पार पडणार आहे. ८ मार्च रोजी अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. भारतात स्पर्धेचे विश्वचषक आयोजन मुंबई (वानखेडे स्टेडियम), चेन्नई (एम. ए. चिदंबरम स्टेडियम), अहमदाबाद (श्री नरेंद्र मोदी (स्टेडियम), कोलकाता (ईडन गार्डन्स स्टेडियम), नवी येथील (अरुण जेटली स्टेडियम), श्रीलंकेतील येथील दिल्ली आर. कोलंबो प्रेमदासा आणि सिनालेस स्पोर्ट्स क्लब कोलंबो येथे खेळविण्यात येणार आहेत.

YouTube video player

भारतीय संघाचा सलामी सामना ७ फेब्रुवारी रोजी अमेरिका संघाशी मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. तर १२ फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध नामिबिया नवी दिल्ली येथील अरूण जेटली स्टोडियमवर खेळवण्यात येणार आहे. १५ फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथील श्री नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने येणार आहेत. सर्व सामने भारतीय वेळेनुसार (Indian Time) सायंकाळी ७.०० वाजता खेळविण्यात येणार आहेत.

कोणता संघ कुठल्या गटात?

गट अ : भारत, पाकिस्तान, नेदरलँड्स, अमेरिका, नामिबिया
गट ब : श्रीलंका, ओमान, ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, ओमान
ट क : इंग्लंड, वेस्ट इंडिज बांगलादेश, इटली, नेपाळ
गट ड : न्यूझीलंड, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका संयुक्त अरब अमिरती, कॅनडा

ताज्या बातम्या

संपादकीय : ६ जानेवारी २०२६ – नवा वाचनतोडगा

0
वाचनसंस्कृती रुजवण्याची गरज नुकत्याच सातारा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली. उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात केलेल्या घोषणेमुळे तिची आठवण पुन्हा...