गुवाहाटी | Guvhati
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात (India and West Indies) बुधवारी (दि.३० सप्टेंबर) रोजी आंध्रप्रदेश क्रिकेट असोसिएशन येथील गुवाहाटी मैदानावर रंगलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघाने (Team India) वेस्ट इंडीज संघाला ७ गडी राखून पराभूत केले. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० ने विजयी आघाडी संपादन केली आहे. मालिकेतील पुढील सामना न्यू चंडीगढ येथील मुल्लानपुर मैदानावर शनिवारी ३ ऑक्टोबरला खेळविला जाणार आहे.
पहिल्या विकेटसाठी भक्कम भागिदारी
भारतीय संघाच्या विजयात कर्णधार शुभमन गिल (Shubhman Gill) रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव ने महत्वपूर्ण योगदान दिले.तसेच मायदेशात शुभमन गिलच्या नेतृत्वात दुसरी मालिका जिंकली. भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. भारतीय संघात आकिब नाबीला संधी देण्यात आली. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेल्या ४०६ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रोहित शर्मा आणि कर्णधार शुभमन गिलने या आव्हानाला प्रत्युत्तर देताना सुरवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पहिल्या विकेटसाठी २५५ धावांची भागीदारी रचून भारताच्या विजयाचा पाया मजबूत केला.
रोहित शर्माच्या नावावर नवा रेकॉर्ड
रोहित शर्माने १० चौकार व ६ षटकारांच्या मदतीने १०१ धावा केल्या. रोहितने भारतीय मायभूमीवर एकदिवसीय क्रिकेट सामन्यात २०० षटकार पूर्ण केले. तसेच १२ हजार धावांचा टप्पा सर केला. ही कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकर, विराट कोहली नंतर तिसरा भारतीय फलंदाज ठरला. एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ३५ वे शतक पूर्ण केले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहलीला हाताशी घेऊन शुभमन गिलने डावाची सुत्रे हाती घेतली. २९.१ षटकांत भारतीय संघाने ३०० वा पूर्ण केल्या. यापूर्वी जोहान्सबर्ग मैदानावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३२.२ षटकांत ३०० धावा केल्या होत्या. त्यानंतर ॠतुराज गायकवाड ने शुभमन गिलच्या साथीने भारतीय संघाला ८ गडी आणि ३९ चेंडू शिल्लक ठेवून दणदणीत विजय संपादन करून दिला.
भारतीय खेळाडूंची चांगली कामगिरी
भारतीय संघाकडून शुभमन गिल २२३, ॠतुराज गायकवाड ३१ रोहित शर्माने १०१ धावा केल्या. शेमार जोसेफ, जेडेन सील्सने १-१ गडी बाद केला. २०२२ मध्ये बांगलादेश विरुद्ध चटगांव येथे भारतीय यष्टीरक्षक ईशान किशनने १२६ चेंडूत द्विशतक पूर्ण केले होते. शुभमन गिलने ११७ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. यापूर्वी शुभमन गिलने न्यूझीलंड विरुद्ध हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर २०८ धावांची खेळी साकारत आपले पहिले द्विशतक पूर्ण केले होते. त्याचबरोबर लक्षाचा पाठलाग करताना ग्लेन मॅक्सवेलनंतर तो द्विशतक पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.
वेस्ट इंडीजने उभारला होता ४०० धावांचा डोंगर
दरम्यान, तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने ७ बाद ४०५ धावांचा डोंगर उभारला. वेस्ट इंडिजने एकदिवसीय क्रिकेट सामन्यात प्रथमच ४०० चा टप्पा पार केला. गुवाहाटी मैदानावरील पहिल्या डावातील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. तसेच वेस्ट इंडिज संघाच्या डावात प्रथमच ३ फलंदाजांनी शतके झळकावली. अमीर जांगूने आपले दुसरे तसेच यष्टीरक्षक फलंदाज शाई होप ने २०वे शतक पूर्ण केले जाॅन कॅमबेल ने १०१ धावा केल्या. भारतीय संघाकडून रवींद्र जडेजा, गुरनुर ब्रार, कुलदीप यादव ने २-२ गडी बाद केले.




