Sunday, November 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIND vs NZ : भारताचा न्यूझीलंडवर २२ धावांनी रोमहर्षक विजय; मालिका ३-१...

IND vs NZ : भारताचा न्यूझीलंडवर २२ धावांनी रोमहर्षक विजय; मालिका ३-१ ने जिंकली

नवी दिल्ली | New Delhi

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand ) यांच्यातील पाचव्या तथा अंतिम एकदिवसीय (ODI) सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर टीम इंडियाने रोमहर्षक विजय मिळवला आहे. अवघ्या २०९ धावांच्या अल्प लक्ष्याचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा डाव १८७ धावांत संपुष्टात आणला आणि हा सामना २२ धावांनी जिंकत पाच सामन्यांची वनडे मालिका ३-१ अशी आपल्या नावावर केली.

- Advertisement -

या ऐतिहासिक विजयासह (Won) न्यूझीलंडची त्यांच्याच मायदेशातील ७ वर्षांची बादशाहत संपुष्टात आली आहे. न्यूझीलंडकडून डीन फॉक्सक्रॉफ्टने सर्वाधिक ३१ धावा केल्या, मात्र संपूर्ण किवी संघ १८७ धावांवर ऑलआऊट झाला. गोलंदाजांच्या शिस्तबद्ध आणि आक्रमक कामगिरीमुळे भारताने (Team India) हा सामना जिंकत मालिकेत दणदणीत विजय मिळवला.

फलंदाजांची निराशा, पण गोलंदाजांचा पलटवार

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. रोहित शर्मा (७), विराट कोहली (५) आणि ऋतुराज गायकवाड (१८) हे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्याने भारताची अवस्था ३ बाद ३४ अशी बिकट झाली होती. कर्णधार श्रेयस अय्यरने २२ धावा केल्या, तर अक्षर पटेल आणि इशान किशन यांनी प्रत्येकी ४६ धावांची संयमी खेळी करत डावाला सावरले. अखेरच्या षटकांत नमन धीर (२२), मोहम्मद सिराज ( नाबाद १४) आणि अर्शदीप सिंगने (४ चेंडूंत २ षटकारांसह १४ धावा) आक्रमक फटकेबाजी केल्यामुळे भारताला ५० षटकांत २०९ धावांपर्यंत मजल मारता आली. न्यूझीलंडकडून जेकब डफी आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी ३, तर मॅट फिशरने २ बळी घेतले.

अर्शदीप-सिराजची घातक गोलंदाजी

२१० धावांच्या साध्या आव्हानाचा पाठलाग करताना उतरलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवातही खराब झाली. भारतीय वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच टिच्चून मारा करत किवी फलंदाजांना मोठी पार्टनर शीप करू दिली नाही. अर्शदीप सिंगने १० षटकांत केवळ ३० धावा देत ३ महत्त्वाचे बळी घेतले. तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ बळी टिपले. तसेच यश ठाकूरने आणि अकीब नबी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

ताज्या बातम्या

Nashik News : दोन महिन्यांत प्रशासकीय फेरबदल; नाशिक पोलिसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik ​आगामी सिंहस्थाच्या (Simhastha) पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस (Nashik City Police) दलाचे संपूर्ण रूपडे पालटणार असून, यंदा भाविकांच्या सुरक्षेसाठी...