Monday, October 26, 2026
Homeक्रीडाIND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय मालिका १९ ऑक्टोबरपासून

IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय मालिका १९ ऑक्टोबरपासून

मुंबई | Mumbai

आशिया चषक क्रिकेट (Asia Cup 2025) स्पर्धा आटोपल्यानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) क्रिकेट संघांमध्ये द्विपक्षीय मालिका (Series) खेळविण्यात येणार आहे. उभय संघांमध्ये ३ एकदिवसीय आणि ५ टी २० सामने खेळविण्यात येणार असून, मालिकेची सुरुवात ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेने होणार आहे.

- Advertisement -

१९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान ही मालिका खेळविण्यात येणार आहे. एकदिवसीय सामने पर्थ,अॅडिलेड आणि सिडनी क्रिकेट मैदानावर (Ground) खेळविण्यात येणार आहेत. भारतीय वेळेनुसार सकाळी ९:०० वाजता सामने सुरू होणार आहेत.

दरम्यान, एकदिवसीय मालिका आटोपल्यानंतर ५ सामन्यांची टी २० मालिका खेळविण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १:४५ वाजता टी २० सामने खेळविण्यात येणार असून, हे सामने कॅनबेरा, मेलबर्न, होबार्ट, बिल पिपेन ओव्हल गोल्ड कोस्ट आणि ब्रिस्बेन येथे होणार आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘चला शाळेत जाऊ’ अभियानामुळे फुटणार बोगस पटसंख्येचा फुगा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शिक्षकांची पदे टिकविण्यासाठी पटसंख्या फुगविण्याचे प्रकार आता उघड होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने हाती घेतलेल्या ‘चला शाळेत जाऊ’ अभियानांतर्गत...