Wednesday, October 14, 2026
Homeक्रीडाIND vs WI : आज भारत-वेस्ट इंडिज चौथा टी-२० सामना; कुठे होणार...

IND vs WI : आज भारत-वेस्ट इंडिज चौथा टी-२० सामना; कुठे होणार लढत?

नवी दिल्ली | New Delhi

भारत आणि वेस्ट इंडिज संघात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेचा चौथा सामना आज (बुधवारी) हैदराबाद येथील श्री राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळविला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होईल. या मालिकेत भारतीय संघाने २-१ अशी विजयी आघाडी घेतली असून, वेस्ट इंडिजचे कर्णधारपद शाई होप सांभाळत आहे.

- Advertisement -

मालिकेतील आव्हान राखण्यासाठी वेस्टइंडिजसमोर अखेरची संधी

मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी वेस्ट इंडिज संघासाठी हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आणि अखेरची संधी असणार आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तान पाठोपाठ आता वेस्ट इंडिजलाही पराभवाची धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

हैदराबाद मैदानाची आकडेवारी व विक्रम

या मैदानावर भारताने आतापर्यंत ४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने विजय मिळवला आहे, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर सर्वाधिक धावसंख्या २९७-६ (११ ऑक्टोबर २०२४) ही असून, भारताने बांग्लादेश विरुद्ध १३३ धावांनी सर्वात मोठा विजय मिळविला आहे. या मैदानावर संजू सॅमसनची १११ ही सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या असून, पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २३० इतकी आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग ११

श्रेयस अय्यर (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, नमन धीर, नीतीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, प्रिन्स यादव आणि मयांक यादव.

ताज्या बातम्या

SIR

मतदारयादीतील तपशील आजच तपासा अन्…! मुख्यमंत्र्यांकडून SIR बाबतचे गैरसमज दूर करण्याचा...

0
मुंबई | Mumbaiमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्लीतील आंदोलनाला राजकीय वळण मिळत असल्याचे चित्र आहे. विरोधी पक्षांसह कॉकरोच जनता पार्टी (CJP)...