Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAsia Cup 2025 : भारतीय संघाची घोषणा; सूर्याकडे धुरा, गिल उपकर्णधार, 'असा'...

Asia Cup 2025 : भारतीय संघाची घोषणा; सूर्याकडे धुरा, गिल उपकर्णधार, ‘असा’ आहे संपूर्ण संघ

मुंबई | Mumbai

आशिया चषक (Asia Cup) क्रिकेट स्पर्धेसाठी आज (मंगळवारी) भारतीय क्रिकेट संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. यात १५ सदस्यांचा समावेश असून, संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) तर शुभमन गिलकडे (Shubhman Gill) उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे.

- Advertisement -

आशिया चषक स्पर्धेत १९ सामने खेळविण्यात येणार असून, सर्व सामने २० षटकांचे असणार आहेत. दुबई आणि अबुधाबी येथे हे सामने होणार असून, स्पर्धेत भारतीय संघाचा समावेश अ गटात करण्यात आला आहे. भारतीय संघ संयुक्त अरब अमिरती, पाकिस्तान आणि ओमान विरूध्द खेळणार आहे.भारतीय क्रिकेट संघ दुपारी १:३० वाजता जाहीर करण्यात येणार होता. मात्र, मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे (Rain) दुपारी २:३० वाजता बैठकीला सुरुवात झाली. त्यानंतर संघाची निवड करण्यात आली.

दरम्यान, आशिया चषक स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर २८ सप्टेंबरला महाअंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघांना ४-४ गटांत विभागण्यात आले आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत आपल्या गटातील ३ संघांविरुद्ध प्रत्येकी १ सामना खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही गटातील (Two Group) अव्वल दोन संघ सुपर ४ साठी पात्र ठरतील. त्यानंतर अव्वल २ संघांमध्ये महाअंतिम सामना होईल.

आशिया चषकसाठी भारतीय संघ खालीलप्रमाणे

सूर्यकुमार यादव (कर्णधार) शुभमन गिल (उपकर्णधार) हार्दिक पांड्या, रिंकुसिंग,अभिषेक शर्मा, तिलक वर्मा,अक्षर पटेल, शिवम दुबे,जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह,तिलक वर्मा,संजू सॅमसन, हर्षित राणा,वरूण चक्रवर्ती,कुलदीप यादव, आणि अर्शदिपसिंग

राखीव खेळाडू – यशस्वी जैस्वाल, रियान पराग, प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज खरेदीला इच्छुकांच्या उड्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या...