मुंबई | Mumbai
न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावरील आगामी एकदिवसीय (ODI) आणि कसोटी क्रिकेट मालिकेसाठी अंतरिम अध्यक्ष प्रज्ञान ओझा (Pragyan Ozha) यांच्या नेतृत्वाखालील भारतीय वरिष्ठ संघ निवड समितीने भारतीय संघाची (Team India) घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी निवड समितीने वेगवेगळ्या सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर केले असून, आगामी ४ नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिकेला प्रारंभ होणार आहे.
कर्णधारपदाची धुरा आणि महत्त्वाचे बदल
एकदिवसीय मालिकेतील पहिल्या ३ सामन्यांसाठी शुभमन गिल (Shubhman Gill) भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे, तर याच सामन्यांसाठी श्रेयस अय्यर उपकर्णधार असणार आहे. यानंतर होणाऱ्या शेवटच्या २ एकदिवसीय सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्व संभाळेल, तर इशान किशन उपकर्णधारपदाची धुरा सांभाळेल. दुसरीकडे, कसोटी मालिकेचे उपकर्णधारपद के. एल. राहुल याच्याकडे सोपविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना एकदिवसीय मालिकेत विश्रांती देण्यात आली असून त्यांना स्थान मिळालेले नाही. तर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांचा संघात समावेश करण्यात आला असला, तरी त्यांना अद्याप तंदुरुस्ती प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित आहे.
संघात नवे चेहरे आणि पुनरागमन
कसोटी संघात जलदगती गोलंदाज आकाशदीप तब्बल १ वर्षानंतर पुनरागमन करत आहे. तसेच अंशुल कंबोज देखील कसोटी संघात (Test Team) सामील झाला आहे. तर एकदिवसीय मालिकेत यश ठाकूर आणि कुमार कुशाग्र पहिल्यांदाच भारतीय संघाकडून खेळताना दिसणार आहेत.
एकदिवसीय मालिकेसाठी संघ (पहिले ३ सामने)
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, के. एल. राहुल, अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनुर ब्रार, अर्शदीप सिंग, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.
एकदिवसीय मालिकेसाठी संघ (उर्वरित २ सामने)
श्रेयस अय्यर (कर्णधार), ईशान किशन (उपकर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नाबी, अर्शदीप सिंग, गुरनुर ब्रार, ऋतुराज गायकवाड, कुमार कुशाग्र, मोहम्मद सिराज, यश ठाकूर, कुलदीप यादव.
कसोटी मालिकेसाठी संघ
शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, के. एल. राहुल (उपकर्णधार), रिषभ पंत, ध्रुव जुरेल, अंशुल कंबोज, रवींद्र जडेजा, आकाशदीप, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वाॅशिंग्टन सुंदर.




