Friday, October 23, 2026
Homeक्रीडाIND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध श्रेयसची परीक्षा; आजपासून टी-२० मालिका

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध श्रेयसची परीक्षा; आजपासून टी-२० मालिका

नवी दिल्ली | New Delhi

न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) आगामी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना कर्णधार श्रेयस अय्यरसमोर (Captain Shreyas Iyer) गोलंदाजीच्या समस्या सोडवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. क्राईस्टचर्च येथे गुरुवारी रंगणाऱ्या पहिल्या सामन्यातून या मालिकेची सुरुवात होत आहे. हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत एका अननुभवी भारतीय संघाला (Team India) न्यूझीलंडच्या अनुकूल परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागणार आहे.

- Advertisement -

भारताची फलंदाजी ही त्यांची खरी ताकद आहे. संघात अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, इशान किशन, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांसारख्या स्फोटक फलंदाजांचा भरणा आहे. मात्र, गोलंदाजीचा समतोल राखणे ही संघाची सर्वात मोठी चिंता ठरत आहे. या मालिकेत जवळपास चार वर्षांनंतर अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांचे पुनरागमन झाले असून त्यांच्या अनुभवाचा भारतीय संघाला मोठा फायदा होऊ शकतो.

दुसरीकडे, न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर (Mitchell Santner) आपल्या मायदेशातील वातावरणाचा फायदा घेत भारतीय फलंदाजीला रोखण्याचा प्रयत्न करेल. मॅट हेनरी, लॅकी फर्ग्युसन, अॅडम मिलने आणि काईल जेमिसन यांसारख्या वेगवान गोलंदाजांची फळी भारताच्या आक्रमक फलंदाजांसाठी आव्हान ठरू शकते. २०२८ मधील आगामी टी-२० विश्वकरंडकाच्या तयारीच्या दृष्टीने आणि परदेशी भूमीवर आपला कर्णधार म्हणून प्रभाव पाडण्यासाठी श्रेयस अय्यरसाठी ही मालिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.

भारतीय संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), संजू सॅमसन, इशान किशन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मयंक यादव, प्रिन्स यादव, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती

न्यूझीलंड संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), डेव्हन कॉन्वे, टिम सैफर्ट, फिन लन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, ग्लैन फिलिप्स, मॅट हेनरी, लॅकी फर्ग्युसन, डम मिलने, काईल जेमिसन, जेकब डफी, झंक फॉल्क्स, नेथन स्मिथ, बेवॉन जेकब्स

ताज्या बातम्या

देवेंद्र

CM Devendra Fadnavis: जरांगेंच्या ऑडिओ क्लिप बॉम्बवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली...

0
मुंबई | Mumbaiमराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी कथित ऑडिओ क्लिप सार्वजनिक केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये ५०० कोटी रुपयांच्या...