Thursday, May 14, 2026
Homeक्रीडाIPL 2026 : आज आयपीएलमध्ये डबल हेडर; CSK समोर LSG चे तगडे...

IPL 2026 : आज आयपीएलमध्ये डबल हेडर; CSK समोर LSG चे तगडे आव्हान, तर RCB-MI यांच्यात प्रतिष्ठेची लढत

मुंबई | Mumbai

आयपीएल (IPL) स्पर्धेचा १९ वा हंगाम निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला असून, अंतिम ४ मध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी अजूनही १० संघ शर्यतीत आहेत. त्यामुळे स्पर्धेचा रोमांच अधिक वाढला आहे. आज (रविवारी) आयपीएलमध्ये दोन सामने खेळले जाणार असून, पहिला सामना एम ए चिदंबरम मैदानावर दुपारी तीन वाजता लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (Lucknow Super Giants and Chennai Super Kings) यांच्यात होईल. तर दुसरा सामना सायंकाळी आठ वाजता रायपूरच्या शहिद वीर नारायण भगत स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल बॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत आपले स्थान भक्कम करण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा असणार आहे.

- Advertisement -

यजमान चेन्नई सुपर किंग्जची धुरा ऋतुराज गायकवाड सांभाळत असून, लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व धडाकेबाज रिषभ पंतकडे आहे. गुणतालिकेत १० गुणांसह सहाव्या स्थानावर असलेल्या चेन्नईसाठी हा सामना होम ग्राऊंडवर विजय मिळवून आगेकूच करण्याची मोठी संधी आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत या दोन संघांमध्ये ८ सामने खेळले गेले आहेत. यामध्ये लखनीने आपले वर्चस्व सिद्ध केले असून, चेन्नई ६-२ अशा फरकाने पिछाडीवर आहे. चेन्नईच्या घरच्या मैदानावर आतापर्यंत २ सामने झाले असून, दोन्ही संघांनी १-१ विजय मिळवत बरोबरी साधली आहे.

लखनौचा विजयी चौकार मारण्याचा निर्धार

मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभवाची धूळ चारल्यानंतर लखनौचा संघ कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. आपला विजयाचा सिलसिला कायम राखत सलग चौथा विजय (विजयी चौकार) नोंदवण्यासाठी रिषभ पंतची सेना सज्ज झाली आहे.

प्रमुख खेळाडू

आजच्या या हायव्होल्टेज सामन्यात मिचेल मार्श आणि निकोलस पूरण यांच्या स्फोटक फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष असेल. तर चेन्नईच्या बाजूने कर्णधार ऋतुराज गायकवाड याला मोठी खेळी करून संघाला सावरण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल,

मुंबई इंडियन्ससमोर खेळाडूंच्या उपलब्धतेचे मोठे संकट

विजयाच्या रथावर स्वार असलेल्या मुंबई इंडियन्ससमोर खेळाडूंच्या उपलब्धतेचे मोठे संकट उभे राहिले आहे. नियमित कर्णधार हार्दिक पांड्याला पाठीच्या दुखापतीमुळे मागील सामन्यातून माघार घ्यावी लागली होती. या सामन्यात तो खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. उपकर्णधार सूर्यकुमार यादवच्या घरी ७ मे रोजी लहान परीचे (कन्यारत्न) आगमन झाले आहे. कौटुंबिक कारणामुळे तो या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मुंबईच्या नेतृत्वाची धुरा नेमकी कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सामन्यात दोन्ही संघांकडे मॅचविनर खेळाडूंची फौज आहे. (Mumbai Indians and Royal Challengers Bangalore)

आरसीबीकडून विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार रजत पाटीदार यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. तर मुंबईकडून अनुभवी जसप्रीत बुमराहची भेदक गोलंदाजी आणि कुणाल पांड्या व रायन रिकलटन यांची कामगिरी निर्णायक ठरेल. दुसरीकडे, लखनौविरुद्धचा मागील सामना गमावलेला बंगळुरू संघ पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतण्यासाठी उत्सुक आहे. आरसीबीने नेतृत्वाची जबाबदारी रजत पाटीदारकडे सोपवली आहे. १२ गुणांसह गुणतालिकेत (Point Table) चौथ्या क्रमांकावर असलेल्या बंगळुरूला आपले स्थान टिकवण्यासाठी हा विजय अनिवार्य आहे.

मैदानावरील स्टार वॉर

या सामन्यात दोन्ही संघांकडे मॅचविनर खेळाडूंची फौज आहे. आरसीबीकडून विराट कोहली आणि कर्णधार रजत पाटीदार यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. तर मुंबईकडून अनुभवी जसप्रीत बुमराहची भेदक गोलंदाजी आणि कुणाल पांड्या व रायन रिकलटन यांची कामगिरी निर्णायक ठरेल.

कोण ठरणार वरचढ?

एकूण सामने : ३५
विजय : मुंबई १९ / बंगळुरू १६

अखेरची लढत वानखेडेवर झालेल्या गेल्या सामन्यात आरसीबीने मुंबईला १८ धावांनी धूळ चारली होती. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मुंबई सज्ज असेल.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजुरच्या तरूणाची ‘एटीएस’कडून चौकशी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याच्या संशयावरून अकोले तालुक्यातील राजुर येथील एका तरूणाची महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस)...