Monday, April 27, 2026
Homeक्रीडाIPL 2026 : राजस्थान रॉयल्स - सनरायझर्स हैदराबाद आज आमनेसामने; जयपूरच्या गडावर...

IPL 2026 : राजस्थान रॉयल्स – सनरायझर्स हैदराबाद आज आमनेसामने; जयपूरच्या गडावर कोण मारणार बाजी ?

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) थरारात शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. जयपूरच्या (Jaypur) ऐतिहासिक सवाई मानसिंग स्टेडियमवर यजमान राजस्थान रॉयल्ससमोर सनरायझर्स हैदराबादचे तगडे आव्हान असेल. गुणतालिकेत वरच्या स्थानावर राहण्यासाठी दोन्ही संघांमध्ये ही चुरस पाहायला मिळेल.

- Advertisement -

सनरायझर्स हैदराबाद संघाचे (SRH) कर्णधारपद यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनकडे तर रियान परागकडे राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद असणार आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघामध्ये २२ सामने खेळले गेले असून, सनरायझर्स हैदराबाद संघाचा वरचष्मा राहिला आहे. हैदराबाद १२-९ फरकाने आघाडीवर आहे. मात्र, जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर ४ सामने खेळले गेले असून, दोन्ही संघांनी २-२ सामन्यात विजय संपादन केला आहे.

राजस्थान रॉयल्स संघाच्या (RR) खात्यात १० गुण जमा असून, राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत दुसन्या स्थानावर आहे. तर सनरायझर्स हैदराबाद संघाच्या खात्यात ८ गुण जमा असून, गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघामध्ये हैदराबाद येथे पार पडलेल्या पहिल्या साखळी फेरीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने ५७धावांनी विजय संपादन केला होता. या पराभवाची परतफेड करण्यासाठी आणि स्पर्धेतील आपला सहावा विजय संपादन करण्यासाठी राजस्थान रॉयल्स सज्ज असणार आहे. तर पाचवा विजय संपादन करण्याची संधी सनरायझर्स हैदराबादकडे असणार आहे.

प्रमुख खेळाडू : यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, हेन्री क्लासेन, ईशान किशन.

पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघातही लढत

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा दुसऱ्या टप्प्याचा धरार अंतिम टप्यात येऊन ठेपला असून, अंतिम ४ मध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी सर्व १० संघांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. शनिवारी (दि.२५) दुपारी ३.३० वाजता पंजाब किंग्ज विरूध्द दिल्ली कॅपिटल्स (Punjab Kings vs Delhi Capitals) संघात नवी दिल्ली येथील अरुण जेटली मैदानावर सामना खेळविण्यात येणार आहे.

पंजाब किंग्जने कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना चमकदार कामगिरी केली आहे. पंजाब किंग्जने ६ सामने खेळले असून, ५ सामन्यात विजय संपादन केला आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत करून गुणतालिकेत अव्वल स्थान अधिक मजबूत करण्यासाठी पंजाब किंग्ज सज्ज असणार आहे. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध अखेरच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने दिल्ली कॅपिटल्स संघाच्या विजयी मोहिमेला ब्रेक लागला आहे. पंजाब किंग्ज संघाला पराभूत करून विजयी चौकार मारण्याची संधी दिल्ली कॅपिटल्सकडे असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद अक्षर पटेलकडे सोपविण्यात आले आहे. अरुण जेटली मैदानावर ११ सामने खेळले असून, दिल्ली कॅपिटल्सने ६-५ फरकाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.तसेच आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये ३५ सामने खेळले असून, दोन्ही संघांनी १७ सामन्यात विजय संपादन केला आहे. या मैदानावर ११ सामने खेळले असून, दिल्ली कॅपिटल्सने ६-५ फरकाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तसेच आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये ३५ सामने खेळले असून, दोन्ही संघांनी १७सामन्यात विजय संपादन केला आहे.

ताज्या बातम्या

Nashik NDCC Bank News : कर्जमाफीच्या अपेक्षेने वसुली कोलमडली; शेतकरी जिल्हा...

0
नाशिक | विजय गिते | Nashik राज्य शासनाकडून कर्जमाफीची (Loan Waiver) घोषणा होईल, या केवळ 'अपेक्षेपोटी' जिल्ह्यातील चालू कर्जदारांनी आपली थकबाकी भरण्याकडे पाठ फिरवली आहे....