मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज सोमवारी जयपूर (Jaipur) येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरूध्द पंजाब किंग्ज संघांमध्ये (Mumbai Indians and Punjab Kings) लढत होणार आहे.मुंबई इंडियन्सची धुरा अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे तर श्रेयस अय्यरकडे पंजाब किंग्ज संघाचे कर्णधारपद असणार आहे.
पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघ यंदाच्या हंगामात प्रथमच आमनेसामने येणार आहेत. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ :३० वाजता सामना खेळविण्यात येणार आहे. पंजाब किंग्ज संघाने (PBKS) आपल्या अखेरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला १० धावांनी पराभूत करून उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित केला आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत करून उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित केला आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्स संघाने १६ गुणांची कमाई करत चौथे स्थान निश्चित केले आहे. तर पंजाब किंग्ज संघाच्या खात्यात १७ गुण जमा असून, पंजाब किंग्ज तिसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांनी आपल्या अखेरच्या सामन्यात (Match) विजय संपादन केला असल्यामुळे गुणतालिकेत अव्वल दोन स्थानात आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी दोन्ही संघ मैदानावर उतरणार आहेत.