Saturday, July 25, 2026
Homeक्राईमIPL 2026 : आज मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्जमध्ये लढत; कुणाची बाजू भक्कम?

IPL 2026 : आज मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्जमध्ये लढत; कुणाची बाजू भक्कम?

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीगचा १९ वा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून,अंतिम चार मध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी सर्व १० संघांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू असल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. आज चेन्नई येथील एम ए चिदंबरम मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Mumbai Indians-Chennai Super Kings) यांच्यात सामना होणार आहे.

- Advertisement -

यंदाच्या हंगामात दोन्ही संघांमध्ये दुसर्‍यांदा सामना खेळविण्यात येणार आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत आपले आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघ विजय मिळविण्याच्या दृष्टीने समोरासमोर असतील. ऋतुराज गायकवाडकडे (Ruturaj Gaikwad) चेन्नई सुपर किंग्ज संघाचे तर हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सचे नेतृत्व आहे.दोन्ही संघांच्या यंदाच्या हंगामातील कामगिरीवर नजर टाकल्यास अनेक चढ उतारांचा सामना करावा लागला आहे. आयपीएल स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ४० सामने खेळले गेले असून, चेन्नई सुपर किंग्ज २१-१९ फरकाने पिछाडीवर आहे.

तसेच चिदंबरम मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या बालेकिल्ल्यात मुंबई इंडियन्सने ७ सामन्यात ५-२ ने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या पहिल्या साखळी फेरीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सवर १०३ धावांनी मात केली होती. या पराभवाची परतफेड करण्याची संधी मुंबई इंडियन्स कडे असणार आहे. तर मुंबई इंडियन्स संघाला सलग दुसऱ्यांदा पराभूत (Defeated) करून उपांत्य फेरीच्या शर्यतीत आपला दावा अधिक मजबूत करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघ उत्सुक आहे.

प्रमुख खेळाडू : सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह

ताज्या बातम्या

Sharad Pawar : केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा युवाशक्तीचा विजय – शरद...

0
मुंबई | Mumbai 'बहुचर्चित 'नीट' (NEET) पेपर लीक प्रकरणानंतर देशभरात निर्माण झालेल्या तीव्र असंतोषामुळे अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला...