Friday, May 1, 2026
Homeक्रीडाIPL 2026 : मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज लढत; अशी आहे...

IPL 2026 : मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज लढत; अशी आहे दोन्ही संघांची ‘हेड टू हेड’ आकडेवारी

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (रविवारी) मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरूध्द मुंबई इंडियन्स मध्ये (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders) सामना खेळविण्यात येणार आहे. सायंकाळी ७:३० वाजता सामना सुरु होणार असून, हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सचे तर मराठमोळा अजिंक्य रहाणे याच्याकडे कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधारपद आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात ३५ सामने खेळले गेले असून, हेड टू हेड आकडेवारी पहिल्यास मुंबई इंडियन्स कायमच वरचढ ठरला आहे.

- Advertisement -

मुंबई इंडियन्सने २४ तर कोलकाता नाईट रायडर्सने ११ सामन्यात सरशी साधली आहे. अखेरच्या ५ सामन्यांचा निकाल बघितल्यास मुंबई इंडियन्सने ३ तर कोलकाता नाईट रायडर्सने २ सामन्यात विजय संपादन केला आहे. तसेच मुंबई येथे वानखेडे स्टेडियमवर १० सामने खेळले असून, मुंबई इंडियन्सने ८ तर कोलकाता नाईट रायडर्सने २ सामने जिंकले आहेत. आयपीएल स्पर्धेच्या २०२५ मधील सीजनमध्ये मुंबई इंडियन्सने बाद फेरीपर्यंत धडक दिली होती. मात्र, पंजाब किंग्जने उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत केल्यामुळे संघाचे ६ वे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले होते.तर कोलकाता नाईट रायडर्स संघाचे आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आले होते. त्यामुळे नव्या उमेदीने मैदानावर उतरण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असणार आहेत.

आयसीसी पुरुष टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये न्यूझीलंड संघातर्फे चमकदार कामगिरी केलेल्या फीन अॅलन, टीम सॅफरिट यांच्या कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे. आयपीएल लिलावात सर्वाधिक बोली लागलेल्या कॅमेरुन ग्रीनकडून चांगली सुरुवात संघाला अपेक्षित असणार आहे. तर बांगलादेश संघाचा लेफ्ट आर्म पेसर मुस्तफिझुर रहेमानला करार मुक्त केल्यानंतर संधी देण्यात आलेल्याब्लेसिंग मुझारबानीला आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपली छाप पाडण्याची संधी असणार आहे. तसेच अष्टपैलू हर्षित राणा दुखापतीमुळे स्पर्धेमध्ये सहभागी होणार नसल्यामुळे त्याची उणीव भरून काढणे हे मोठे आव्हान असणार आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्स (MI) संघाबद्दल बोलायचे झाल्यास क्विंटन डिकॉक, रायन रिकलटन, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव सारखे घातक फलंदाज असल्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये विल जॅक्स,कॉबीन बॉश, राज अंगद बावा, मिचेल सॅंटनेर, हे खेळाडू आहेत. तर गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, अश्विनी कुमार, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडे, दिपक चाहर आहेत. तसेच कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या फलंदाजीची मदार टीम सॅफरिट, फीन अॅलन, अजिंक्य रहाणे, सुनील नारायण, रिंकुसिंग, कॅमेरून ग्रीन, रचिन रवींद्र,मनीष पांडे यांच्यावर असणार आहे. तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये रचिन रवींद्र, अनुकूल रॉय, सुनील नारायण, कॅमेरून ग्रीन, रॉवमन पॉवेल उपलब्ध आहेत. याशिवाय गोलंदाजीत कार्तिक त्यागी, उमरान मलिक, आकाश दिप, वैभव अरोरा आहेत.

ताज्या बातम्या

मिसिंग

Mumbai-Pune Missing Link: मिसिंग नव्हे तर ‘कनेक्टिंग लिंक’, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई-पुणे...

0
पुणे | Puneमुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर कमी करणाऱ्या आणि प्रवासाचा वेग वाढवणाऱ्या बहुप्रतिक्षीत 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे आज दिमाखात लोकार्पण झाले. मुख्यमंत्री...