Thursday, October 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIPL Auction : तब्बल तीन वर्षांनंतर लिलाव पुन्हा भारतातच; BCCI चा मोठा...

IPL Auction : तब्बल तीन वर्षांनंतर लिलाव पुन्हा भारतातच; BCCI चा मोठा निर्णय

मुंबई | Mumbai

जागतिक क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत लीग मानल्या जाणाऱ्या ‘इंडियन प्रीमियर लीग’च्या (IPL) आगामी २० व्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत (Meeting) महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, आगामी आयपीएल २०२७ चा लिलाव परदेशात न होता भारतातच आयोजित केला जाणार आहे.

- Advertisement -

३ वर्षांनंतर लिलावाचे स्वदेशी पुनरागमन

मागील तीन वर्षांपासून आयपीएलचा लिलाव परदेशात पार पडला होता. यामध्ये अबुधाबी, जेद्दाह आणि दुबई येथे लिलावाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. मात्र, आगामी २०२७ मधील मिनी लिलाव (Mini Auction) भारतातच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत यावर चर्चा झाली.

लवकरच तारीख आणि ठिकाण निश्चित होणार

लिलावासाठी लागणारी पंचतारांकित (फाइव्ह स्टार) हॉटेल्सची उपलब्धता आणि आगामी लग्नसराईचा काळ लक्षात घेऊन लिलावाचे निश्चित ठिकाण व तारीख लवकरच जाहीर केली जाईल. २०२७ चा लिलाव हा ‘मिनी लिलाव’ असणार आहे, तर २०२८ मधील ‘मेगा लिलाव’ (Mega Auction) पुन्हा एकदा भारताबाहेर आयोजित केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

१० मार्चपासून रंगणार २० वा हंगाम?

आयपीएल २०२७ चा २० वा हंगाम १० मार्च ते १५ मे या कालावधीत आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. या संपूर्ण हंगामात एकूण ७४ सामने खेळवले जाणार असून, सलग १८ वर्षांपासून जगभरातील क्रिकेटप्रेमींचे मनोरंजन करणाऱ्या या स्पर्धेच्या विसाव्या पर्वाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्या

शारदीय नवरात्रोत्सव : सप्तश्रृंगी गडावर ललिता पंचमीनिमित्त देवीची महापुजा; भाविकांची गर्दी

0
कळवण | प्रतिनिधी Kalwan आदिशक्तीचे आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर गुरुवारी शारदीय नवरात्रोत्सवातील ‘ललिता पंचमी’च्या निमित्ताने भाविकांच्या भक्तीचा महापूर अनुभवायला मिळाला. पहाटेच्या पहिल्या किरणांपासून...