Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanju Samson : आयसीसी टी २० क्रमवारीत संजू सॅमसनची मोठी झेप; थेट...

Sanju Samson : आयसीसी टी २० क्रमवारीत संजू सॅमसनची मोठी झेप; थेट पटकावला ‘हा’ नंबर

नवी दिल्ली | New Delhi

आयसीसी पुरुष टी २० (ICC T20 World Cup) विश्वचषक स्पर्धेमध्ये कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघांमध्ये रंगलेल्या सामन्यात नाबाद ९७ धावांची खेळी साकारलेल्या यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एक खास गिफ्ट दिले आहे.

- Advertisement -

आज (बुधवारी) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार संजू सॅमसनने (Sanju Samson) २५ स्थानांची गरूड झेप घेऊन ४० वा क्रमांक पटकावला आहे. तर अभिषेक शर्मा ८७४ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर, साहिब जादा फरहान (८४८) गुणांसह दुसऱ्या, फील सॉल्ट(८०८) गुणांसह तिसऱ्या आणि ईशान किशन (७८३) गुणांसह पाचव्या स्थानावरून चौथ्या क्रमांकावर आहे.

तसेच तिलक वर्मा (Tilak Varma) सहाव्या क्रमांकावर आला आहे. त्याचबरोबर गोलंदाजीत वरूण चक्रवर्ती (७७१) गुणांसह पहिल्या, पाकिस्तानचा अब्रार अहमद तिसऱ्या आणि रशीद खान दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह सातव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर अर्शदिप सिंग ६ स्थानांची प्रगती करत १३ व्या स्थानावर आहे.

दरम्यान, दुसरीकडे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुसऱ्या आणि पाकिस्तानचा सईम आयुब तिसऱ्या स्थानावर आहे. तर शिवम दुबेला दोन स्थानांचा फटका बसला असून, तो नवव्या आणि अक्षर पटेल (Akshar Patel) विसाव्या क्रमांकावर घसरला आहे.

ताज्या बातम्या

Meenakshi Natarajan : मोठी बातमी! काँग्रेसला निवडणुकीपूर्वी धक्का; उमेदवार मीनाक्षी नटराजन...

0
दिल्ली । Delhi देशभरात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच, राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक वृत्त समोर आले आहे. काँग्रेसच्या माजी...