Saturday, November 14, 2026
Homeक्रीडाUnder 19 Asia Cup Final : पाकिस्तानचे भारतासमोर ३३८ धावांचे आव्हान; शेवटच्या...

Under 19 Asia Cup Final : पाकिस्तानचे भारतासमोर ३३८ धावांचे आव्हान; शेवटच्या २० षटकांत टीम इंडियाचे कमबॅक

नवी दिल्ली | New Delhi

अंडर-१९ आशिया कप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात (Aisa Cup Final) पाकिस्तानने भारतासमोर (Team India) विजयासाठी ३३८ धावांचे तगडे आव्हान उभे केले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने निर्धारित ५० षटकांत ९ गडी गमावून ३३७ धावा केल्या. पाकिस्तानकडून सलामीवीर उस्मान खानने शतकी खेळी केली, तर शेवटच्या षटकांत भारतीय गोलंदाजांनी केलेल्या शानदार पुनरागमनामुळे पाकिस्तानला ३५० धावांचा टप्पा गाठण्यापासून रोखण्यात यश आले.

- Advertisement -

पाकिस्तानची मजबूत सुरुवात

पाकिस्तानने (Pakistan) नाणेफेक जिंकून फलंदाजीचा घेतलेला निर्णय त्यांच्या फलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर उस्मान खानने १११ चेंडूंत ३ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने १०७ धावांची धमाकेदार शतकी खेळी केली. उस्मान खान आणि हयाम खान (२१ धावा) यांनी अर्धशतकी भागीदारी करत आश्वासक सुरुवात केली. त्यानंतर उस्मान आणि अब्दुल कादीर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११३ चेंडूंत १३५ धावांची आक्रमक भागीदारी केली.

तर अब्दुल कादीरने अवघ्या ५४ चेंडूंत ८० धावांची तडाखेदार खेळी केली, तर कर्णधार फरहान युसुफने ६० चेंडूंत ६३ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. पहिल्या ३० षटकांत पाकिस्तानी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले होते. ३० षटकांपर्यंत पाकिस्तानने २०० धावांचा टप्पा ओलांडला होता आणि त्यांच्या हातात ८ गडी शिल्लक होते. त्यामुळे पाकिस्तान ३७० ते ३८० धावांपर्यंत मजल मारेल असे वाटत होते.

भारतीय गोलंदाजांचे शेवटच्या २० षटकांत जबरदस्त कमबॅक

भारताचा कर्णधार लक्ष्य रायचंदानीने या सामन्यात तब्बल आठ गोलंदाजांचा वापर केला. पहिल्या ३० षटकांत धावा खाणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या २० षटकांत सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलले. अखेरच्या २० षटकांत भारताने ७ फलंदाजांना बाद करत पाकिस्तानच्या धावगतीला लगाम लावला आणि त्यांना ३३७ धावांवर रोखले. भारताकडून काव्या पटेल सर्वात यशस्वी ठरला, त्याने १० षटकांत ६८ धावा देत सर्वाधिक ४ बळी टिपले. तसेच चिगुरुपती व्यंकटने ३, तर अर्जुन राजपूतने १ विकेट घेत मोलाची कामगिरी बजावली.

पाकिस्तानचा रेकॉर्ड आणि अंतिम सामन्याचे समीकरण

अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यांच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेच्या फायनलमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही पाकिस्तानच्याच नावावर आहे; २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताविरुद्ध ३४७ धावा केल्या होत्या. गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्यात आणि यंदाच्या साखळी फेरीत पाकिस्तानने भारतावर मात केली होती. त्यामुळे मागील पराभवांचा हिशोब चुकता करत भारतीय संघ ३३८ धावांचे हे कठीण आव्हान पार करून आशिया कप उंचावणार का? याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : पत्नी असतानाही अल्पवयीन मुलीला पळवून नेले! तिरुपती-अक्कलकोटसह...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik ​विवाहित असूनही १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या मुंबईतील (Mumbai) ३४ वर्षीय तरुणाला नाशिक शहर गुन्हे शाखेच्या (अंबड...