Sunday, April 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजIPL 2025 : आज डबल हेडर; 'या' संघांत लढत, कोण बाजी मारणार?

IPL 2025 : आज डबल हेडर; ‘या’ संघांत लढत, कोण बाजी मारणार?

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (शनिवारी) दोन सामने खेळविण्यात येणार आहेत. यातील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट (Gujarat Titans and Lucknow Super Giants) यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना पंजाब किंग्ज विरूध्द सनरायझर्स हैदराबाद (Punjab Kings vs Sunrisers Hyderabad) यांच्यात सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे. हा सामना मुल्लानपुर येथील महाराजा राजेवेंद्रसिंग क्रिकेट स्टेडियम चंदीगड येथे होणार आहे.

- Advertisement -

पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाची धुरा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतकडे असणार आहे. तर गुजरात टायटन्स संघाचे कर्णधारपद शुभमन गिलकडे (Shubman Gill) असणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने ५ सामने खेळले असून त्यापैकी ४ सामने जिंकत ८ गुणांची कमाई केली आहे. दुसरीकडे लखनौ सुपर जायंट्स संघाने ५ पैकी ३ सामन्यात विजय संपादन केला आहे. त्यामुळे विजयी चौकार मारण्यासाठी लखनौ सुपर जायंट्स सज्ज असणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये ५ सामने खेळले असून, गुजरात टायटन्सने ४ तर लखनौ सुपर जायंट्स ने १ विजय संपादन केला आहे.

तसेच दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाची धुरा श्रेयस अय्यरकडे तर पॅट कमिन्सकडे सनरायझर्स हैदराबाद संघाचे कर्णधारपद असणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. सलामी लढतीत राजस्थान रॉयल्स विरूध्द ४४ धावांनी विजय संपादन करून हैदराबादने दमदार सुरुवात केली होती. मात्र, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, आणि लखनौ सुपर जायंट्स विरूध्द संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे पराभवाची मालिका खंडित करून विजयी मार्गावर परतण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद सज्ज असणार आहे.

दरम्यान, पंजाब किंग्ज संघाने ४ सामने खेळले असून, चेन्नई सुपरकिंग्ज, लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स विरूध्द विजय संपादन केला आहे. मात्र राजस्थान रॉयल्स विरूध्द सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे मुल्लानपुर येथील महाराजा राजेवेंद्रसिंग क्रिकेट स्टेडियम वर पंजाब किंग्ज ने २ सामने खेळले असून, चेन्नई सुपरकिंग्ज विरूध्द १८ धावांनी विजय संपादन केला आहे. राजस्थान रॉयल्स विरूध्द पराभवाचा सामना करावा लागला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या