मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (सोमवारी) सायंकाळी मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Mumbai Indians and Kolkata Knight Riders) संघांमध्ये सामना खेळविण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे तर कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे असणार आहे.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ३४ सामने खेळविण्यात आले असून, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास मुंबई इंडियन्स संघाने २३ तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने ११ सामन्यात विजय संपादन केला आहे. विशेष म्हणजे मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये ११ सामने खेळविण्यात आले असून, मुंबई इंडियन्स संघाने ९ तसेच कोलकाता नाईट रायडर्सने २ सामन्यात विजय संपादन केला आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांमध्ये (Teams) खेळविण्यात आलेल्या अखेरच्या ५ सामन्यांच्या निकालावर नजर टाकल्यास कोलकाता नाईट रायडर्सने ३ तर मुंबई इंडियन्सने २ सामने जिंकले आहेत.
दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या फलंदाजीची (Batting) मदार अंगक्रिश रघुवंशी, रिंकुसिंग, क्विंटन डिकाॅक, अजिंक्य रहाणे, रेहमनुलला गुरबाझ, मनीष पांडे, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल यांच्यावर असणार आहे.तर गोलंदाजीत स्पेंसर जाॅनसन, हर्षित राणा, वैभव आरोरा, सुनील नारायण, मयंक मार्कंडे, वरूण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, अॅनरीक नाॅरकिया आहेत. तसेच मुंबई इंडियन्स संघाच्या फलंदाजीची मदार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, रायन रिक्लेटन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, नमन धीर यांच्यावर असणार आहे. तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये वील जॅक्स, मिचेल सॅंटनेर, हार्दिक पांड्या, अर्जून तेंडुलकर हे पर्याय उपलब्ध आहेत. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर,करण शर्मा, मुजीबूर रहेमान,लिझाड विल्यम्स आहेत.