मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्याचे अधिकृत वेळापत्रक (Schedule) भारतीय क्रिकेट नियामक (Indian Cricket Association) मंडळाने जाहीर केले आहे. पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने बाद फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र चौथ्या स्थानासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स शर्यतीत आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल (IPL Match) क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित १७ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र, बाद फेरीचे (Play Off Schedule) सामने कुठे होणार? याबद्दल आयपीएल क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. त्यानंतर अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बाद फेरीच्या सामन्यांचे वेळापत्रक घोषित केले.
त्यानुसार चंदीगड येथील महाराजा यादवेंद्रसिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि अहमदाबाद येथील श्री नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपांत्य फेरीच्या सामन्यांचे आयोजन करण्यात येईल. असे स्पष्ट केले आहे. तर नवीन वेळापत्रकानुसार २९ मे रोजी पहिला क्वालिफायर ३० मे रोजी एलिमिनेटर हे सामने चंदीगड येथील महाराजा यादवेंद्रसिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात येतील. तसेच क्वालिफायर २ आणि अंतिम सामना अहमदाबाद (Ahmedabad) येथील श्री नरेंद्र मोदी स्टेडियमवर १ व ३ जून रोजी खेळविण्यात येणार आहे.