मुंबई | Mumbai
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज (शनिवारी) महिलांच्या आयसीसी टी २० टीम आॉफ द इयर संघाची घोषणा केली आहे. आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या संघात दक्षिण आफ्रिका संघाची कर्णधार लॉरा व्होल्वाडोटकडे संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या संघात भारतीय संघाच्या दीप्ती शर्मा, यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोष आणि सलामीवीर फलंदाज स्मिती मंधाना यांची निवड करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे लॉरा व्होल्वाडाटने १९ सामन्यात १२५.०९ स्ट्राइक रेट ने ६७३ धावा केल्या आहेत. यामध्ये ३ अर्धशतकांचा आणि एका शतकाचा समावेश आहे.भारतीय क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मिती मंधानाने (Smiti Mandhana) २३ सामन्यात ४२.६३च्या सरासरीने ८ अर्धशतके झळकावली आहेत. विशेष म्हणजे भारतीय संघाची अष्टपैलू दीप्ती शर्माने भारतीय संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाकडून फलंदाजी आणि गोलंदाजीत महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे २०२४ मध्ये खेळलेल्या टी २० सामन्यात तिने ३० गडी बाद केले आहेत.
तर श्रीलंका (Sri Lanka) येथे २०२४ मध्ये खेळविण्यात आलेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये नेपाळ विरूध्द ३-२० आणि पाकिस्तान विरुद्ध सर्वोत्तम कामगिरी केली होती. तसेच श्रीलंका क्रिकेट संघाची कर्णधार चमारी अट्टापटु हिने २१ टी २० सामन्यात ७२० धावा केल्या होत्या. यात तिने २ शतके आणि ४ अर्धशतके झळकावली होती. विशेष म्हणजे पाकिस्तानसंघाकडून सादिया इक्बाल, आयर्लंडसंघाच्या ओरला फ्रेंडरगास्ट आणि इंग्लंड संघाच्या नॅट सेवियर ब्रंट यांचा समावेश आहे.
असा आहे संपूर्ण संघ
चमारी अट्टापटु, स्मिती मंधाना, रिचा घोष, दीप्ती शर्मा, नॅट सेवियर ब्रंट, सादिया इक्बाल,लॉरा व्होल्वाडाट,मेईले केर,मेरिझने काप ओरला फ्रेंडरगास्ट,हिली मॅथ्यूज
सलिल परांजपे, नाशिक