मुंबई | वृत्तसंस्था | Mumbai
भारतीय संघासाठी (Team India) २०२५ वर्ष स्थित्यंतराचं असणार आहे. या वर्षात भारतीय संघाची नव्याने बांधणी होणार आहे. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma and Virat Kohli) हे निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. त्यामुळे कसोटी आणि वनडे संघाची नव्याने बांधणी करावी लागणार आहे. खासकरून कर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर पडणार हे सर्वकाही ठरवावं लागणार आहे.
टी २० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी२० क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement) जाहीर केली. आता तिघंही वनडे आणि कसोटी सामन्यात खेळतात, आता पुढच्या वर्षात रोहित आणि विराटच्या निवृत्तीचे वेध लागले आहेत, कदाचित भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरला नाही. तर या दोघांसाठी ही बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका शेवटची उरु शकते. २०२५ या वर्षात टीम इंडिया इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज, बांग्लादेश यांच्यासोबत मालिका खेळणार आहे. तर चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप स्पर्धा खेळणार आहे.चॅम्पियन्स ट्रॉफी वनडे फॉर्मेटमध्ये, तर आशिया कप टी-२० फॉर्मेटमध्ये आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेतील पाचवा कसोटी सामना ३ ते ७ जानेवारी दरम्यान सिडनीत खेळला जाईल.भारतीय संघ २०२५ वा वर्षात पाच बनडे मालिका खेळणार आहे. यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. तर दोन मालिका धरच्या मैदानावर तर दोन विदेशात खेळणार आहे. इंग्लंडविरुद्ध ३ सामने (होम ग्राउंड), चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (दुबई), बांगलादेशविरुद्ध ३ सामने (भारताबाहेर), ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामने (भारताबाहेर). दक्षिण अफ्रिकेविरुद्ध ३ सामने (होमग्राउंड) असे वनडे मालिकेचं वेळापत्रक आहे. भारत २०२५ या वर्षात पाच टी-२० मालिका खेळणार आहे.
यात आशिया कप २०२५ वा समावेश आहे. इंग्लंडद्धि पाच सामन्यांची टी२० मालिका (होमग्राउंड), बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका (भारताबाहेर), आशिया कप २०२५, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका (भारताबाहेर), दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका (होमग्राउंड) असं वेळापत्रक आहे. भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवणार की नाही हे अजून पां नाही. कदाचित टीम इंडियाच्या पदरी निराश पडेल असं दिसत आहे. २०२५ वर्षात बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे.
त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चैम्पियनशिप अंतिम फेरी गाठली तर एक सामना खेळेल. इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका (भारताबाहेर), वेस्ट इंडिज विरुद्ध दोन सामन्ऱ्यांची कसोटी मालिका (होमग्राउंड) आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका (होमग्राउंड) असं वेळापत्रक असेल. टीम इंडियाकडून नववर्ष २०२५ मधून फार अपेक्षा आहेत. खासकरून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने यश मिळवावं अशी क्रीडाप्रेमींची अपेक्षा आहे. कारण मागच्या पर्वात पाकिस्तानने भारताचा अंतिम फेरीत धुव्वा उडवला होता. त्यामुळे विजयाचं स्वप्न भंगले होते.
भारत विरुद्ध इंग्लंड (५ टी-२०, ३ वन-डे)
पहिला टी-२० – २२ जानेवारी (चेन्नई)
दूसरी टी-२० – २५ जानेवारी (कोलकाता)
तिसरा टी-२० – २८ जानेवारी (राजकोट)
चौथा टी-२० – ३१ जानेवारी (पुणे)
पाचवा टी-२० – १२ फेब्रुवारी (अहमदाबाद)
पहिली वनडे – २ फेब्रुवारी (मुंबई)
दुसरी वनडे – ६ फेब्रुवारी (नागपूर)
तिसरी वनडे – ९ फेब्रुवारी (कटक)
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी
पहिली कसोटी – जून २०-२४ (हेडिंगली)
दुसरी कसोटी – जुलै २-६ (एजबेस्टन)
तिसरी कसोटी – जुलै १०-१४ (लॉर्ड्सस)
चौथी कसोटी – जुलै २३-२७ (मॅचेस्टर)
पाचवा कसोटी – ३१ जुलै ते ४ ऑगस्ट (ओव्हल)
चॅम्पियन्स ट्रॉफी -फेब्रुवारी-मार्च
भारत विरुद्ध बांगलादेश- २० फेब्रुवारी (दुबई)
भारत विरुद्ध पाकिस्तान – २३ फेब्रुवारी (दुबई)
भारत विरुद्ध न्यूझीलंड – २ मार्च (दुबई)
उपांत्य फेरी-४ मार्च (दुबई)
अंतिम फेरी – ९ मार्च (दुबई)