Wednesday, June 26, 2024
Homeक्रीडा'किंग कोहलीचे' शानदार शतक; सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी केली बरोबरी

‘किंग कोहलीचे’ शानदार शतक; सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी केली बरोबरी

मुंबई | Mumbai

- Advertisement -

आयसीसी वर्ल्ड कप २०२३ (ICC World Cup 2023) मध्ये भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात रविवारी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli 49th Century) त्याच्या वाढदिवशी शतक ठोकत माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. सचिन तेंडुलकरने वनडेमध्ये ४९ शतके ठोकली होती. आता या विक्रमाची विराट कोहलीने आज बरोबरी केली आहे.

विराट कोहलीने यंदाच्या विश्वचषकातील दुसरे शतक झळकावले आहे. सचिनच्या वनडे शतकांची बरोबरी केल्यानंतर विराट कोहलीवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विराट कोहलीने आत्तापर्यंत २८९ वनडे सामने खेळले असून त्यात त्याने ५८.४३ च्या सरासरीने आणि ९३.५५ च्या स्टाईक रेटने धावा खेचल्या आहेत. १२७५ फोर आणि १४९ सिक्स असा भन्नाट रेकॉर्ड विराटच्या नावावर राहिला आहे.

किंग कोहलीचे झंझावाती शतक

भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने वादळी सुरुवात करुन दिली. पण एकापाठोपाठ एक दोन धक्के बसल्यानंतर विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. विराट कोहलीने मैदानावर वर्चस्व गाजवले. विराट कोहलीने श्रेयस अय्यरच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. विराट कोहलीने ११९ चेंडूमध्ये शतक ठोकले. सुरुवातीच्या षटकात विराट कोहलीने संयमी फलंदाजी केली. चांगल्या चेंडूला मान देत विराट कोहलीने एकेरी दुहेरी धावसंख्या काढली. त्यानंतर वेगाने धावा केल्या. विराट कोहलीने आपल्या शतकी खेळीत १० चौकारांचा समावेश आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या