Sunday, October 6, 2024
Homeनगरफवारणी पंपासाठी अर्ज करण्यास कृषी विभागाचे आवाहन

फवारणी पंपासाठी अर्ज करण्यास कृषी विभागाचे आवाहन

कापूस साठणूक बॅगही शंभर टक्के अनुदानावर कृषी विभाग पुरवणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून अनेक योजना राबविण्यात येतात. यंदा 2024- 2025 या योजनेअंर्तगत खरीप हंगामासाठी 100 टक्के अनुदानावर शेतकर्‍यांसाठी कृषी यांत्रिकिकरण या अंर्तगत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप व बियाणे औषधे व खते याअंर्तगत कापूस साठवून बॅग या उपकरणासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी कृषी विभागाने शेतकर्‍यांना आवाहन केले आहे.

- Advertisement -

जिल्हा अधीक्षक कृषी सुधाकर बोराळे यांनी शेतकर्‍यांना केलेल्या आवाहन म्हटले की, बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी 6 ऑगस्टपर्यत तर कापूस साठवून बॅगसाठी 31 ऑगस्टपर्यत अर्ज महाडीबीटी पोर्टवर ऑनलाईन पध्दतीने करावे. ऑनलाईन पध्दतीने महाडीबीटी पोर्टवर केलेल्या अर्जातून शेतकर्‍यांची निवड करण्यात येणार आहे. ही योजन शेतकर्‍यांसाठी शंभर टक्के अनुदानावर आहे. यामुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी योजनेचा लाभ घ्यावा, तसेच बॅटरीपंपासाठी 6 ऑगस्ट म्हणजेच मंगळवारपूर्वी तर कापूस साठवणूक बॅगेसाठी 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या