Saturday, May 4, 2024
Homeनाशिकखावटी योजनेचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवा : आ. बनकर

खावटी योजनेचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवा : आ. बनकर

दिक्षी । वार्ताहर Dikshee

तळागाळातील लोकांपर्यंत खावटी अनुदान योजना ( Khawati Anudan Yojana ) पोहोचवण्यासाठी प्रत्येक गावामध्ये प्रयत्न करणार आहे. ज्या लोकांना योजनेचा लाभ मिळू शकला नाही त्या लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. खावटी अनुदान प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन आ. दिलीप बनकर ( MLA. Dilip Bankar) यांनी केले आहे.

- Advertisement -

तालुक्यातील 12,277 अनुसूचित जमातीतील नागरिकांनी खावटी कर्ज अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी सुमारे 11,194 लाभार्थ्यांना खावटी योजनेचा लाभ मिळणार आहे. येथील बाजार समिती सभागृहात तालुक्यातील लाभार्थ्यांना खावटी योजनेअंतर्गत किराणा मालाच्या साहित्याचे वाटप प्रसंगी आ. बनकर बोलत होते. याप्रसंगी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या विभागीय प्रकल्प अधिकारी वर्षा मीना, आदिवासी विभागाचे अधिकारी राठोड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी भोई, निफाडचे गटविकास अधिकारी संदीप कराड, जि. प. सदस्य सिद्धार्थ वनारसे उपस्थित होते.

यावेळी वस्तू स्वरुपात मटकी, चवळी, हरभरा, वटाणा, उडीद डाळ, तूरडाळ, साखर, शेंगदाणा तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहा पावडर आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी पहिल्यांदा ही योजना निफाडमध्ये राबवण्यात आली असून यात कुठल्याही लाभार्थ्याला काही अडचण आल्यास त्यांनी थेट आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आदिवासी प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांनी केले. याप्रसंगी तालुक्यातील लाभार्थी उपस्थित होते. खावटी अनुदान मिळाल्याने लाभार्थ्यांमध्ये यावेळी समाधान व्यक्त करण्यात येत होते. कार्यक्रमाचे संयोजन आदिवासी विभागाने केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या