नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिकच्या लष्करी युनिटमधील नाईक पदावर कार्यरत संशयित संदीप सिंह याने नाशिकसह इतर ठिकाणांहून पाकिस्तान गुप्तचर संस्थेसाठी (आयएसआय) हेरगिरी केल्याचे समाेर आले आहे.
- Advertisement -
त्याने पाकिस्तान येथील आयएसआय एजंटला मोबाइलद्वारे मागील दोन वर्षांत नाशिक, जम्मू व पंजाबमधील काही लष्करी छावण्यांचे फोटो, शस्त्रास्त्रे, अधिकाऱ्यांच्या नियुक्तींची माहिती व नकाशे पाठविल्याचे तपासात उघड झाले आहे.
त्यानुसार अमृतसर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने शनिवारी (दि. ८) संदीप सिंह याला अटक केली. यासंदर्भात अमृतसर ग्रामीणचे मुख्य पाेलीस अधिक्षक चरणजित सिंह आणि अधिक्षक हरिंदर सिंह यांनी माहिती दिली.