Saturday, May 4, 2024
Homeनगरश्रीकृष्णनगरमधील नागरिकांचा नगरपालिकेवर मोर्चा

श्रीकृष्णनगरमधील नागरिकांचा नगरपालिकेवर मोर्चा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीकृष्णनगर नेवासारोड कुटे हॉस्पिटल भागातील वसाहतीत गेल्या पाच वर्षापासून नगरपालिकेचे पिण्याचे पाणी पुरेसे येत नसल्याने तेथील त्रस्त नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयात जाऊन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी मुलांसह महिला मोठ्या प्रमणात सहभागी झाल्या होत्या.

- Advertisement -

कामगार नेते नागेश सावंत यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी श्री. सावंत यांच्या हस्ते पाणी पुरवठा अधिकारी ईश्वरकट्टी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे कि, येथील नागरिकांनी 29 जानेवारी 2020 रोजी पाणी येत नसल्याबाबत निवेदन दिले होते. परंतु त्यास प्रशासनाने केराची टोपली दाखविली. हा प्रश्न आजपर्यंत सुटलेला नाही. नगरपरिषदेने पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा केला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या भागातील नागरिकांचा पाच वर्षापासूनचा प्रश्न तातडीने सोडवावा, त्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नये, असे पोपटराव आदिक, मनोज यादव यावेळी म्हणाले. पाणी येत नसल्याने महिलांनीही आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी पाणी पुरवठा अधिकारी ईश्वरकट्टी यांनी निवेदन स्वीकारून तुमचा प्रश्न आठ दिवसाच्या आत सोडवण्याचे आश्वासन दिले व आंदोलन करण्याची तुमच्यावर वेळ येणार नाही, अशी ग्वाही दिली.

यावेळी श्रीकृष्णनगर येथील महंत भाविकराज बाबा महाराज, सुनील महाराज घुग्गे, गोविंद महाराज, ग्रामपंचायत सदस्य सुनील लेंगरे, अप्पासाहेब आदिक, समीर इनामदार, मनोज यादव, श्री. खरात, पपू शिंदे, मुनीर शेख, श्री. कापकर, श्री. वराडे, श्री. वाकचौरे, श्री. शिंदे, तुषार झुरळे, श्री. सुर्यवशी, ओंकार इंगळे, यांच्यासह 25 महिला आणि 55 पुरुष उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या