Saturday, October 5, 2024
HomeनंदुरबारSSC Result 2021 : नंदुरबार जिल्हा नाशिक विभागात अव्वल

SSC Result 2021 : नंदुरबार जिल्हा नाशिक विभागात अव्वल

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यात नाशिक विभागात नंदुरबार जिल्हा अव्वल ठरला असून जिल्हयाचा निकाल ९९.९९ टक्के लागला आहे.

- Advertisement -

दरम्यान, आज दुपारी १ वाजेला दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने दहावीचे सर्वच विद्यार्थी व पालक उत्सुक होते. परंतू संकेस्स्थळ हँग झाल्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

करोनाच्या पार्श्‍वभुमीवर प्रथमच इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मुलांचा इयत्ता नववीचा निकाल, दहावीतील चाचण्या, दोन्ही वर्षांचे विद्यार्थ्यांचे मुल्यांकन, खेळ आदी बाबींवर इयत्ता दहावीचा निकाल तयार करण्यात आला.

गेल्या दोन महिन्यांपासून संबंधीत शिक्षक विद्यार्थ्यांचे दोन्ही वर्षांचे मुल्यांकन करण्यात व्यस्त होते. अखेर दि. १६ जुलै रोजी निकाल जाहीर करण्यात आला. दुपारी १ वाजेला निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने विद्यार्थी व पालक सकाळपासूनच उत्सुक होते.

परंतू निकालाचे संकेतस्थळ हँग झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल समजू शकला नाही. रात्री उशिरापर्यंत संकेतस्थळ दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा हिरमोड झाला.

दरम्यान, आज जाहीर झालेल्या निकालात नंदुरबार जिल्हा नाशिक विभागात अव्वल ठरला आहे. नंदुरबार जिल्हयाचा निकाल ९९.९९ टक्के लागला. जिल्हयात ११ हजार ३२७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ११ हजार ३२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

तर ९ हजार ७४८ विद्यार्थिनी प्रविष्ठ झाल्या होत्या. त्यापैकी सर्वच विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. नाशिक विभागात सर्वाधिक निकाल नंदुरबार जिल्हयाचा लागला.

- Advertisment -

ताज्या बातम्या