Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSSC Result 2025 : प्रतिक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार; विद्यार्थ्यांना...

SSC Result 2025 : प्रतिक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार; विद्यार्थ्यांना कुठे पाहता येणार निकाल?

पुणे | Pune 

मागील आठवड्यात बारावीच्या परिक्षांचा निकाल (HSC Result) जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यासह पालकांचे लक्ष दहावीचा निकाल (SSC Reuslt) कधी लागणार? याकडे लागले होते. अखेर आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

त्यानुसार दहावीच्या परीक्षेचा निकाल (Result) उद्या म्हणजेच मंगळवारी (दि.१३ मे) रोजी दुपारी ०१ वाजता ऑनलाईन (Online) जाहीर होणार आहे. याबाबतची माहिती आज बोर्डाकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना (Student) आपापल्या शाळांमध्ये गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे.

YouTube video player

दुसरीकडे यंदा राज्याचा बारावीचा निकाल एकूण ९१.८८ टक्के लागले होता. तसेच यंदा देखील बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली होती. उत्तीर्ण होण्याऱ्या मुलींची एकूण टक्केवारी ९४.५८ टक्के इतकी होती तर मुलांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का ८९.५१ टक्के होता.

दरम्यान, यंदा राज्यभरातून १६ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसलेले होते. राज्यातील २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेसाठी (SSC Exam) नोंदणी केली होती. तसेच संपूर्ण राज्यात ५ हजार १३० मुख्य केंद्र होते.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन

दहावीची निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी अनेक कॉलेजमध्ये चकरा माराव्या लागतात. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाने यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे.

असा चेक करा निकाल

महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
होमपेजवर उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र एसएससी निकाल २०२५ लिंकवर क्लिक करा.
मग एक नवीन पेज उघडेल. त्याठिकाणी विद्यार्थ्यांना तपशील भरावा लागणार आहे.
आता सबमिटवर क्लिक करा आणि तुमचा निकाल दिसेल.
तुमचा निकाल तपासा आणि गुणपत्रक डाउनलोड करा.

विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल

https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org

ताज्या बातम्या

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा- राज्य निवडणूक आयुक्तांचे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच...