ज्ञानेश दुधाडे
अहमदनगर – कोरोना लॉकडाऊनच्या आदेशात दहावीचा शेवट पेपर अडकला. पण त्यापूर्वी झालेल्या इतिहास आणि राज्यशास्त्र पेपरच्या जिल्ह्यात 67 हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पोस्टाची सेवा बंद असल्याने तालुका पातळीवर गाठोड्यात बांधून आहेत. या पेपरची तपासणी न झाल्याने आता निकालही लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत गेल्याने सुरूवातीला संचारबंदी लागू करण्यात आली. त्या काळातही दहावीची परीक्षा सुरूच होती. नंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यापाठोपाठ शिक्षणंमत्री वर्षा गायकवाड यांनीही दहावीचा शेवटचा भूगोलचा पेपर 31 मार्चपर्यंत पुढं ढकलण्याची घोषणा केली. देशात लॉकडाऊन करत डेट पंतप्रधान मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत त्याची मुदत वाढविली. त्यामुळे शेवटचा पेपर होईल की नाही याबाबत सांशकता असतानाच आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे दहावीच्या हिस्ट्री आणि पॉलिटिक्सच्या पेपरच्या उत्तरपत्रिका या तपासणीसाठी अजूनही पोहच झालेल्या नाहीत. तालुकापातळीवरील परिक्षक (कस्टडीयन) यांच्या ताब्यात या उत्तरपत्रिकांचे गाठोडे पडून असल्याची माहिती हाती आली आहे. शिक्षण विाागानेही त्याला दुजोरा दिला.
…………….
……………………
दहावीच्या इतिहासाच्या 66 हजार 908 उत्तरपत्रिका तालुका ठिकाणीच
भूगोल विषयाचा पेपर होणे बाकी
जून महिन्यातील निकाल लांबणीवर पडणार
……………..
घरीच तपासले विज्ञानाचे पेपर
बारावीच्या परीक्षा झाली असून जवळपास सर्व विषयांचे पेपरही तपासून झालेले आहेत. विज्ञान विषयाचा पेपरच्या उत्तपत्रिका शिक्षकांनी एकत्रित बसून तपासणी करण्यात येते. मात्र, यंदा या पध्दतीला फाटा देत कोरोनाच्या पाशर्वूमीवर हे पेपर शिक्षकांनी घरी तपासले असून ते पुन्हा शिक्षण मंडळाकडे जमा केलेले आहे. काही ठिकाणी हे काम बाकी असून ते लवकरच पूर्ण होईल, असे शिक्षण विाागातील सुत्रांनी सांगितले.
कोरोना : दहावीचा निकाल लांबणार

ताज्या बातम्या
Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान
अंबासन । वार्ताहर Ambasan
बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...