Monday, September 16, 2024
Homeमनोरंजनरिया चक्रवर्तीला NCB कडून अटक

रिया चक्रवर्तीला NCB कडून अटक

मुंबई | Mumbai

- Advertisement -

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात(SSR) रोज नवनवीन खुलासे होत आहे. गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक्स ब्युरो (NCB) रिया चक्रवर्तीची(riya chakravarthi) चौकशी करत आहे. आज देखील रिया चक्रवर्ती सकाळी साडेदहा वाजता नार्कोटिक्स ब्युरोमध्ये पोहोचली. त्यानंतर झालेल्या चौकशीत तिने एक धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे तिला अटक करण्यात आली आहे.

सुशांत सिंह राजपूतने ड्रग्स घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप रियाने केला आहे. रियाचा आरोप आहे की, सुशांतने तिला ड्रग्स घेण्यास भाग पाडले. अखेर तिला अटक करण्यात आली आहे.

रियाने याआधी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये अमली पदार्थांची चव कधीच चाखलेली नाही, असा दावा केला होता. २८ ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकाने १० दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन हस्तगत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या