Tuesday, April 23, 2024
Homeधुळेधुळे बसस्थानकात एसटी प्रशासनाने मंडप हटविला, संप सुरुच

धुळे बसस्थानकात एसटी प्रशासनाने मंडप हटविला, संप सुरुच

धुळे Dhule। प्रतिनिधी

धुळे आगारात (Dhule depot) कामगारांचा संप (Workers strike) मोडून (Breaking) काढण्यासाठी आता एसटी प्रशासनाने(ST administration) कठोर पावले (Strict steps) उचलली असून आज बसस्थानकात आंदोलनासाठी उभारलेला मंडप हटविण्यात आला. मात्र इतर सर्व कामगार संपावर (labor strike) असून त्यांनी तोंडावर बोट ठेवत आंदोलन केले. बसेस बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तर चार कामगार आज कामावर रुजू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

एस.टी. कामगारांनी संप मागे घेवून त्वरीत कामावर रुजु होण्याचा अल्टिमेटमेंटम परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला होता तरी धुळे विभागात एसटी कामगारांचा संप सलग 20 व्या दिवशी सुरुच आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने संप मोडकळीस आणण्यासाठी धुळे येथील मुख्य बसस्थानकात कामगारांनी उभारलेला मंडप आज हटवला. आंदोलन मागे घेवून त्वरीत काम सुरु करा, अन्यथा बडतर्फीची कारवाई करण्याचा इशारा यावेळी कामगारांना दिला आहे.

परंतु विलीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या कर्मचार्‍यांनी तोंडावर बोट ठेवत आंदोलनस्थळी ठिय्या मांडला आहे. प्रशासन कितीही दुर्लक्ष करीत असले तरी आम्ही तोंड बंद करुन मार सहन करु पण आंदोलन सत्याग्रहाच्या सनदशिर मार्गाने सुरुच ठेवू असा निर्धार यावेळी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला.

आता पर्यत 54 कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, सरकारने सेवा समाप्ती आणि बडतर्फीची कारवाई सुरु केली असली तरी संप सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे.

प्रवाशांचे हाल

गेल्या 19 दिवसांपासून धुळे आगारातून बस धावत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल होत आहे. प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. परंतू खासगी वाहनचालक अधिक भाडे आकारत असल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या