Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAccident : एसटी व ट्रकचा अपघात; दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर...

Accident : एसटी व ट्रकचा अपघात; दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर जखमी

येवला । प्रतिनिधी Yeola

येवला- मनमाड महामार्गावर अनकाई पाटी येथे ट्रक व एसटी बसचा समोरासमोर अपघात होऊन दोन्ही वाहनचालकांचा मृत्यू झाला आहे. तर १८ प्रवाशी जखमी झाले आहेत यातील इंदूबाई निवृत्ती मोरे नाटेगाव ता कोपरगाव व शोभा गोपीनाथ कुमावत ब्राम्हणगाव ता कोपरगाव या २ महिला प्रवाशी गंभीर जखमी असून त्यांना कोपरगाव व नाशिक येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
.
ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला असण्याचा अंदाज आहे हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा पुढील भाग ड्रायव्हर केबिन पर्यंत पूर्णपणे दाबला गेला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मनमाड आगाराची मनमाडहुन शिर्डीकडे जाणारी बस क्रमांक एमएच- ०६ एस ८४२८ व येवल्याकडून मनमाडकडे जाणारी ट्रक क्रमांक एम एच २१ बी एच ४६६९ या दोन्ही वाहनात अनकाई येथे समोरासमोर भीषण अपघात झाला.

- Advertisement -

या अपघातात एसटी चालक भाऊसाहेब मोठाभाऊ गांगुर्डे व ट्रकचालक यांचा जागेवरच मृत्यू झाला अपघातातील जखमींना येवला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याबाबत येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...