Friday, June 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजST Bus Accident : महाराष्ट्रातील दोन बसेसचा सुरतमध्ये अपघात; ७ जणांचा मृत्यू,...

ST Bus Accident : महाराष्ट्रातील दोन बसेसचा सुरतमध्ये अपघात; ७ जणांचा मृत्यू, ४१ जखमी

सुरत | Surat

गुजरातमधील (Gujarat) सुरत (Surat) जवळील मानेकपूर उवा गावाजवळ महाराष्ट्राच्या (Maharashtra) दोन एसटी बसेसचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. या दुर्घटनेत ७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, ४१ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती असून, अपघातात फक्त एका चालकाची ओळख पटली आहे. तर उर्वरीत ६ जणांची अद्यापही ओळख पटलेली नाही.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बसेसपैकी एक धुळ्याहून (Dhule) सुरतला जात होती, तर दुसरी महाराष्ट्राकडे येत होती. एका बसवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजक ओलांडून उलटली आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसला धडकली. अपघातानंतर उलटलेल्या बसला भीषण आग (Fire) लागली आणि ती काही सेकंदांतच खाक झाली. सुदैवाने तिथून जाणाऱ्या तापी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी तत्परता दाखवत तातडीने मदतकार्य सुरू केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या एसटी बस दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करत शोक व्यक्त केला असून, त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात राज्य सरकार सहभागी असल्याचे सांगितले आहे. जखमींची संपूर्ण काळजी घेतली जात असून आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. तसेच एसटी आणि जळगाव जिल्हा प्रशासन सुरत जिल्हा प्रशासनाशी संपर्कात आहेत आणि आवश्यक ती सर्व मदत पुरविली जात आहे. या अपघातात जखमी झालेल्यांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Crime News : दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

0
पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्यातील सराफ व्यापाऱ्याच्या दरोडा प्रकरणातील संशयित आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर आरोपीने गोळीबार केल्याची थरारक घटना पाथर्डी...