अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
एसटी बसच्या धडकेत (ST Bus Accident) एका वृध्द महिलेचा मृत्यू (Old Woman Death) झाला. गंगुबाई केशव शिंदे (वय 75 रा. नागरदेवळे ता. नगर) असे मयत वृध्द महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महिलेला भररस्त्यात मारहाण पीआय गोकावे निलंबीत
ही घटना गुरूवारी सायंकाळी साडे पाच ते सहा वाजेच्या दरम्यान माळीवाडा बस स्थानक (Maliwada Bus Stand) परिसरात घडली. गंगुबाई केशव शिंदे गुरूवारी सायंकाळी माळीवाडा बस स्थानक (Maliwada Bus Stand) परिसरात असताना एका एसटी बसची त्यांना धडक बसली. या धडकेत जखमी झालेल्या गंगुबाई यांना उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दोन शिक्षकांवर निलंबनाचा प्रस्ताव
दरम्यान उपचारापूर्वीच तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) अकस्मात मृत्यूची नोंद केली असून गंगुबाई शिंदे यांचे नातेवाईकांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महिलेचा विनयभंग करत कुर्हाडीने घाव घालून केले गंभीर जखमी