Monday, June 24, 2024
Homeनगरढवळगाव अपघातातील मृतांची संख्या पाचवर

ढवळगाव अपघातातील मृतांची संख्या पाचवर

बेलवंडी |वार्ताहर| Belwandi

- Advertisement -

श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील ढवळगाव येथील एसटी व कार अपघातातील (ST Bus And Car Accident) खाजगी गाडीच्या चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला आहे. यामुळे या अपघातातील मृतांची संख्या पाच वर पोहचली आहे. शनिवारी (दि.4) दुपारी तीन वाजेच्या दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव परीसरात श्रीगोंदा-शिरूर मार्गावर एसटी बस व इर्टिगा कार यांच्यात झालेल्या भिषण अपघातात (Accident) तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील चार व्यक्तींचा जागेवर मृत्यू (Death) झाला होता. तर उर्वरित तीन व्यक्तींवर खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते.

उपचारादरम्यान इर्टिगा गाडीचे चालक विठ्ठल ढोले (रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने लोणी व्यंकनाथ परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातील पारगाव सुद्रिक येथील दत्तात्रय बळीराम खेतमाळीस, भाऊसाहेब बाबुराव मडके, हरी तुकाराम लडकत, विश्वनाथ लक्ष्मण ननवरे यातील एक जण सोसायटीचे उपाध्यक्ष व तीन जण संचालक होते ते जीवलग मित्र होते. आळंदीवरून देवदर्शन करून येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

रात्री उशिरा या सर्वांवर पारगाव येथे अत्यंत भावुक वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताबद्दल एसटी बस चालक याने बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये (Belwandi Police Station0 दिलेल्या फीर्यादीवरून (एमएच 12 टी.वाय 4352) या इर्टिगा कारचा चालक मयत विठ्ठल ढोले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुकीच्या पध्दतीने ओव्हरटेक करताना चालकांचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात (Accident) झाला, असे दिलेल्या फीर्यादित नमुद करण्यात आलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या