Monday, June 17, 2024
Homeक्राईमएसटी बस वाहकावर प्रवाशाचा शस्त्राने वार; गुन्हा दाखल

एसटी बस वाहकावर प्रवाशाचा शस्त्राने वार; गुन्हा दाखल

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

- Advertisement -

नेवासा ते नेवासाफाटा दरम्यान नाशिक-पाथर्डी बसच्या चालकाने गाडीत झोपून राहिलेल्या प्रवाशास नेवासा मागे गेले आहे. उतरुन घ्या असे म्हटल्याचा राग आल्याने त्याने वाहक व चालकाला मारहाण करुन शस्त्राने वार करुन जखमी केल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एसटी वाहक देवदत्त शरदराव अंदुरे (वय 36) रा. खरवंडी कासार ता. पाथर्डी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, 28 मे रोजी नाशिक ते पाथर्डी ही बस पाथर्डीकडे घेवून येत असताना टिकीटाचे हिशोेबापेक्षा एक इसम गाडी मध्ये अधिक असल्याचे मला समजल्याने मी सर्व प्रवाशांना विचारपूस करत असताना, एक इसम हा झोपलेला होता. त्यास उठवुन तिकिट विचारले असता त्याचे टिकीट हे नेवासा पर्यंतचे होते. त्यास आम्ही नेवासा पाठीमागे गेले आहे. तुम्ही उतरून दुसरे गाडीने पुन्हा माघारी जा असे सांगितले असता त्याने शिवीगाळ केली व बसच्या खाली न उतरता मला धक्काबुक्की करून दमदाटी करू लागला. त्यावेळी चालक पांडुरंग ज्ञानदेव कार्ळेी हेही पाठीमागे बसमध्ये आले.

तेव्हा त्यांना देखील त्या अनोळखी इसमाने शिवीगाळ दमदाटी केली व त्यास मी खाली उतरवत असताना त्याने त्याचे हातातील लालसर रंगाचे काहीतरी धारदार हत्याराने माझे डोक्यात कपाळाचे वर जोरात फटका मारून मला जखमी केले.
या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीवर गुन्हा रजिस्टर नंबर 515/2024 भारतीय दंड संहिता कलम 353, 332, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या