Friday, September 20, 2024
Homeनगरभिंगारमध्ये एसटी चालकाला मारहाण

भिंगारमध्ये एसटी चालकाला मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

रोडवर उभी केलेली दुचाकी काढण्यासाठी हॉर्न वाजविल्याचा राग मनात धरून एसटी बस चालकाला मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. सोमवारी (दिनांक 1 मे) दुपारी पावणे तीन वाजता भिंगार वेस येथे ही घटना घडली. हरीष लक्ष्मणराव बिरादार (वय 36 रा. प्रकाश हॉटेलजवळ, सैनिकनगर, भिंगार, मूळ रा. शिरोळ जानापुर ता. उदगिर, जि. लातुर) असे मारहाण झालेल्या चालकाचे नाव आहे.

त्यांनी सोमवारी सायंकाळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीवरील (एमएच 16 सीएल 2613) अज्ञात चालकाविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिश बिरादार हे भिवंडी (जि. ठाणे) एसटी आगारात नेमणुकीला आहे. ते सोमवारी दुपारी त्यांच्या ताब्यातील एसटी बस (एमएच 40 एन 9161) ही नगर-पाथर्डी रोडने भिंगारमधून घेऊन जात असताना भिंगार वेसीजवळ रोडवर दुचाकी उभी होती.

बिरादार यांनी सदरची दुचाकी बाजूला काढण्यासाठी एसटी बसचा हॉर्न वाजविला. सदर ठिकाणी एक इसम आला व त्याने रोडवरील दुचाकी बाजुला लावली. हातामध्ये विटकर व सिमेंटचा तुकडा घेऊन बिरादार यांच्या दिशेने गेला. तुला दम निघत नाही का, असे म्हणून शिवीगाळ केली. विटकर व सिमेंटचा तुकडा फेकून मारून दुखापत करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बिरादार यांनी प्राथमिक उपचार करून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या