Thursday, September 19, 2024
Homeनगरराहाता, शिर्डी बस स्थानकात राज्य परिवहन कर्मचार्‍यांच्या संपामुळे शुकशुकाट

राहाता, शिर्डी बस स्थानकात राज्य परिवहन कर्मचार्‍यांच्या संपामुळे शुकशुकाट

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

- Advertisement -

राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे आम्हालाही वेतन द्या यासह इतर मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी बंद पुकारला आहे. या बंदचे पडसाद राहाता, शिर्डीतही मोठ्या प्रमाणात उमटल्याचे दिसून आले. एरवी राज्य परिवहन महामंडळाचे शेकडो बसेसची ये जा आणि हजारो प्रवाशांची गर्दी असणार्‍या राहाता व शिर्डी बसस्थानकावर या बंदमुळे दररोजच्या गर्दीच्या प्रमाणात शुकशुकाट अनुभवयास मिळाला.

देशाच्या कानाकोपर्‍यातून सबका मालिक एक असणार्‍या साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत हजारो भाविक दररोज येत असतात. राज्यासह परराज्यातील परिवहन मंडळाच्या बसमध्ये प्रवास करून येणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र मंगळवारी बंदच्या पार्श्वभूमीवर शिर्डी बसस्थानकावर प्रवाशांची संख्या नगण्य दिसून येत होती. इतरवेळी बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने वर्दळ व रेलचेल होऊन बस पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी धावपळ उडताना बघायला मिळते. मात्र बंदच्या दिवशी बसस्थानकावर अपवाद वगळता फलाट फार्मला बसेस लागलेल्या नव्हत्या. फलाट फार्म रिकामे दिसत होते. इतरवेळी गर्दीच गर्दी असल्याने कुठला फलाट फार्म कुठे आहे, कोणती बस कुठे थांबणार हे जवळ जाऊन वाचल्यानंतरच अनेकांच्या लक्षात यायचे मात्र आज परिस्थिती उलट होती.

रस्त्यावरून लांबूनच सर्व फलाट फार्म वरील नावे वाचता येत होती. शिर्डी बसस्थानकावर कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, हैदराबाद येथील महामंडळाच्या अर्थात परराज्यातून जवळपास 57 बसेस फेर्‍या मारतात तर महाराष्ट्रातील जिल्ह्यातून सुमारे 496 गाड्या फेर्‍या मारतात. बंदमुळे या गाड्यांनी फेर्‍या मारल्या नाहीत. परराज्यातील गाड्या आल्या होत्या त्याही हाउसफुल होत्या. खाजगी प्रवासी वाहतूक मात्र तेजीत असल्याचे दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या