Sunday, November 17, 2024
Homeनंदुरबारविसरवाडी येथे एस.टी.बस-ट्रकचा अपघात ; 15 प्रवासी जखमी

विसरवाडी येथे एस.टी.बस-ट्रकचा अपघात ; 15 प्रवासी जखमी

नवापूर । श.प्र. Navapur

नवापूरहून (Navapur) नाशिककडे (nashik) जाणार्‍या नवापूर डेपोची बस (s t bus) आणि ट्रकमध्ये (truck) समोरासमोर धडक होवून अपघात (accident) झाला. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत.

- Advertisement -

नवापूर येथून निघालेली नाशिककडे जाणारी नवापूर आगाराची बस विसरवाडीजवळ सुसाट वारा आणि पावसामुळे बस चालकाला समोरील वाहन न दिसल्याने बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की बस आणि ट्रकचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. बस चालकाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे.नवापूर येथून 20 ते 22 प्रवासी घेऊन निघालेली बस विसरवाडी येथून दोन प्रवासी घेतल्यानंतर काही अंतरावर हा भीषण अपघात झाला. यात 15 प्रवासी जखमी झाले असून दोन्ही चालक गंभीर अवस्थेत असल्याची माहिती मिळाली आहे. विसरवाडी येथील 108 रुग्णवाहिका तत्काळ दाखल झाली.

जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यात आले. दोन्ही वाहन एकमेकात शिरल्याने स्थानिक नागरिक आणि गॅरेज चालकाच्या मदतीने वाहन सरकवण्यात आले. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मदतकार्य सुरू आहे. मात्र, चालकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनास्थळी नवापूर आगार विभागाचे वाहतूक निरीक्षक सचिन पाटील, आर.एस.काझी यांनी जाऊन जखमींना मदत दिली. घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. एस टी बसमधील जखमी प्रवासीमीनाबाई सुभाष अंबोदे (55, रा.राजीवनगर नवापूर), कविता योगेश मरसाळे (27, रा.कावठे ता.साक्री जि.धुळे), संदीप वसंत अभोरे (20, रा.राजीवनगर नवापूर), योगेश रावसाहेब मरसाळे (33, रा.कावठे ता.साक्री), ज्योती जयराम गावीत (26, रा.धनराट ता.नवापूर), उषाबाई वसंत अबोरे (40रा.राजीवनगर नवापूर), आशाबाई रामदास मांडोळे (46, रा.राजीवनगर नवापूर), ताईबाई विकासस्वर (65,भगतवाडी नवापूर), मनोज रामदास पांडोळे (22,भगतवाडी नवापूर), रंजीत गमन गावीत (रा.चौकी रा नवापूर), राहुल भाऊसाहेब पवार (30, रा.कोनाकनगर आडगाव नाशिक), वनिता अनिल वसावे (62, उमराण ता.नवापूर), रा.प चालक तिडके, सारथी अनिल नरसाळे (3, रा.साक्री), वाहक गायकवाड.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या