Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजएसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा ७ तारखेला होईल - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक...

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा ७ तारखेला होईल – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ग्वाही

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

यापुढे राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होईल,याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल! असे नि:संदिग्ध ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी येथे दिली. आर्थिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन कधीही रखडणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रताप सरनाईक यांनी आज मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयात जाऊन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी बोलताना सरनाईक यांनी यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असा शब्द दिला. आर्थिक अडचणीमुळे एसटीत काम करणाऱ्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन केवळ ५६% देता आले, हे अत्यंत दुर्दैवी असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

यापुढे एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच परिवहन सेवा प्रवासीभिमुख आणि दर्जेदार करण्यासाठी काही चांगले निर्णय आम्ही घेणार आहोत. त्यामध्ये सर्व बसस्थानकावरील प्रसाधनगृहे ही अत्याधुनिक पद्धतीची स्वच्छ आणि निर्जंतुक असतील. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बसस्थानकावर आणि नवीन येणाऱ्या बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणे या वर भर देणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

यंदा २ हजार ६४० लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असून त्यापैकी ११३ आगारात ८०० पेक्षा जास्त नवीन बसेस प्रवासी सेवेत रुजू झाल्या आहेत. सध्या तीन हजार नवीन बसेसची निविदा प्रक्रिया सुरू असून भविष्यात ग्रामीण आणि दुर्गम भागात उपयुक्त ठरेल अशा मिडी बसेस घेण्यात येणार आहेत. तसेच शहरी भागातील उन्नत स्तरातील प्रवाशांसाठी २०० अत्याधुनिक, वातानुकूलित शयनयान बसेस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी घेतल्या जातील, अशी माहितीही प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली.

एसटीसाठी १२० कोटी रुपयांचा निधी वितरित
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा थकलेला ४४ टक्के पगार देण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी तातडीने १२० कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतला. सलग सुट्ट्या असल्याने येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना उर्वरित वेतन अदा होईल. तसेच उरलेले ९४६ कोटी रुपये तीन टप्प्यांमध्ये महामंडळाला दिले जाणार आहेत. या निधीसाठी प्रताप सरनाईक यांनी आज मंत्रालयात वित्त विभागाचे सचिव सौरभ विजय यांची भेट घेतली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...