सटाणा । प्रतिनिधी
येथील बसस्थानकात बसमध्ये चढत असलेल्या प्रवाशांच्या खिशातील 45 हजार रूपयाची रोकड अज्ञात चोरटयाने लंपास केली.
- Advertisement -
शरद गंभीर बर्वे (45 रा. जोरण) हा प्रवाशी गावी जाण्यासाठी सटाणा-जोरण बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील 45 हजार रूपयाची रोकड नकळत लंपास केली.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर बर्वे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.