Friday, April 25, 2025
Homeमुख्य बातम्याएस टी महिला वाहक कर्मचारी भगीनींचे मुख्यमंत्र्यांना साकडे; राज्य परिवहन महामंडळ आगारातील...

एस टी महिला वाहक कर्मचारी भगीनींचे मुख्यमंत्र्यांना साकडे; राज्य परिवहन महामंडळ आगारातील महिला वाहक, कर्मचारी अनोखा उपक्रम

नाशिक | प्रतिनिधी

७५ वे अमृत महोत्सव वर्ष साजरे केले जात असताना राज्य परिवहन महामंडळ परिवारातील महिला वाहक व कर्मचारी भगीणी यांनी अनोखी शक्कल लढवत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, परिवहन मंत्री,यांना रक्षाबंधना निमित्ताने राखी पाठवुन आमच व कुटुंबाच जीवन सुरक्षीत राहण्यासाठी सातावा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करत आहेत. “नको ओवाळणी,नको खाऊ,सातवा वेतन आयोग द्या भाऊ” अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

” घ्या निर्णय वेगवान व करा महाराष्ट्र गतिमान” हे महाराष्ट्र शासनाने घोषवाक्य अमलात आणुन लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला सातवा वेतन आयोग लागू करावी ,अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी राखी अभियान ३० ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्र राज्यातील परिवहन महामंडळात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

रक्षाबंधनानिमित्त आगळावेगळा आंदोलनात्मक उपक्रम महिला वाहक कर्मचारी भगिनीनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,परिवहन मंत्री यांना राखी पाठवून सातवा वेतन आयोगाची हक्काची मागणी ओवाळणी म्हणून मागणार आहे.

गेल्या वर्षांपुर्वी मुंबई येथे आझाद मैदानावर ऐतिहासिक बेमुदत आंदोलन करुन तत्कालीन सरकारला जाग आली नव्हत. मात्र, यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत या महाराष्ट्र राज्याचा एकत्रित कामकाज विकास करत आहे, तसाच विकास राज्य परिवहन महामंडळाचा करुन या महामंडळातील कामगार,कर्मचारी यांना रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली जात आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील आगारामध्ये सर्व आगारातील सर्व महिला वाहक व कर्मचाऱ्यांनी पोस्टाने एक-एक राखी पाठविण्यात यावी व झोपलेल्या राज्य सरकारला झोपेतून उठण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवावा ,अशी मागणी एस टी महिला व कर्मचारी यांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pune News : पुण्यात १०० हून अधिक पाकिस्तानी नागरिक

0
पुणे (प्रतिनिधी) पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सध्या एकूण १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. ५६ महिला आणि ३५ पुरुष दीर्घकालीन व्हिसावर भारतात आले आहेत, अशी माहिती...