Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रएसटी संप : सरकारकडून लिखित आश्वासन मिळेपर्यंत संप सुरूच राहणार

एसटी संप : सरकारकडून लिखित आश्वासन मिळेपर्यंत संप सुरूच राहणार

गेल्या 11 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा (st workers strike)संप सुरू आहे. कामगारांनी संप मागे घेण्यास नकार दिलेला असतानाच एसटी कामगारांचे वकील अॅड. गुणवंत सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, जोपर्यंत राज्य सरकारकडून(state goverment) लिखित आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहणार आहे. दरम्यान, एसटीच्या संपाबाबत आज 3 वाजेपर्यंत शासन आदेश जारी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

ड्रग्ज प्रकरणातील धुळ्याचा सुनील पाटील अन् मोहीत कंबोज

- Advertisement -

एसटीच्या संपाबाबत आज 3 वाजेपर्यंत शासन आदेश जारी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सरकारचे प्रतिनिधी कुठेही असू देत सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे. ही प्रक्रिया 12 आठवड्यात पूर्ण करायची आहे. आंध्र प्रदेश सरकारप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांबाबत जसे काम केले तसेच काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावे. संप मिटवायचा की नाही याबाबत संध्याकाळी निर्णय घेण्यात येईल. सरकारचा लिखित आदेश वाचल्याशिवाय संप मिटवणार नाही, असं सदावर्ते यांनी सांगितलं.

माधुरी भाड्याच्या घरात राहणार, महिन्याच्या भाड्यात तुमचे स्वत:चे घर होणार

मनसेचे संपात सहभागी होण्याचे आवाहन

मनसे नेते बाळा नांदगावकर(Bala Nandgoankar) यांनी पत्र काढून पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पत्रात म्हटलंय की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात(ST Employee Agitation) महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन, आर्थिक समस्यांमुळे ३० हून अधिक कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैरकारभारामुळे मनात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टीमुळे एसटी कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचा भडका उडाला आहे असं त्यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या