Wednesday, January 7, 2026
Homeदेश विदेशपहिल्या श्रावणी सोमवारच्या दिवशीच दुर्दैवी घटना; महादेव मंदिरात चेंगराचेंगरी, दर्शनावेळी २ जणांचा...

पहिल्या श्रावणी सोमवारच्या दिवशीच दुर्दैवी घटना; महादेव मंदिरात चेंगराचेंगरी, दर्शनावेळी २ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आज पहिला श्रावण सोमवार असल्याने रविवार रात्रीपासूनच भगवान शंकराच्या मंदिरांबाहेर दर्शनासाठी भाविकांची मोठ्या रांगा लागल्याचे पहायला मिळत आहे. या दरम्यानच, उत्तर प्रदेशमध्ये श्रावणी सोमवारी मोठी दुर्घटना घडली आहे. बाराबंकी जिल्ह्यातील हैदरगड भागात असलेल्या प्रसिद्ध अवसानेश्वर महादेव मंदिरात विद्युत प्रवाह पसरल्याने चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत २ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाल्याचे समजत आहे.

अवसानेश्वर मंदिराबाहेर भाविकांच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेली पत्र्याची शेड विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथील अवसनेश्वर मंदिराबाहेर करंट लागल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने मंदिराच्या परिसरात एकच खळबळ उडाली. त्यामूळे त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी होऊन 40 भाविक जखमी झाले आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावणी सोमवारनिमित्त अवसानेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. जलाभिषेकादरम्यान काही माकडांनी मंदिरात असलेल्या पत्र्याच्या शेडवर उड्या मारल्या. त्यामुळे तार तुटली आणि शेडवर पडली. तार पडताच त्यातून विद्युत प्रवाह शेडमध्ये पसरला, ज्यामुळे तेथे उपस्थित लोक घाबरले आणि चेंगराचेंगरी झाली. घटनेनंतर मोठ्या संख्येने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना रुग्णवाहिकेने हैदरगड आणि त्रिवेदीगंज येथील आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. अनेक अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

YouTube video player

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे २-२.३० वाजण्याच्या सुमारास घडली जेव्हा मंदिरात जलाभिषेक विधीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. माकडांमुळे जुन्या विद्युत तारांचे नुकसान झाले होते. यामुळे विजेचा धक्का बसला असल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी शशांक त्रिपाठी यांनी दिली.

दोन जणांचा मृत्यू ४० जण जखमी
काही माकडांनी विजेच्या तारेवर उडी मारली. ज्यामुळे तार तुटली आणि मंदिराच्या परिसरातील शेडवर पडून करंट लागला. यानंतर भाविकांनी पळून जाण्यासाठी प्रयत्न केले मात्र मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. या घटनेमध्ये दोन जणांचा जीव गेला असून 40 जण गंभीर जखमी झाले आहेत, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची अजूनही चौकशी सुरू असून मंदिर प्रशासनाने यावर भाष्य करणे टाळले आहे. श्रावण सोमवार असल्याने मध्यरात्रीपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

मृतांमध्ये लोणीकात्रा पोलीस स्टेशन परिसरातील मुबारकपुरा गावातील २२ वर्षीय रहिवासी प्रशांत आणि आणखी एका भाविकाचा समावेश आहे. दोघांनाही उपचारासाठी त्रिवेदीगंज सीएचसी येथे आणण्यात आलं होतं मात्र त्यांचा मृत्यू झाला. रविवारी उत्तराखंडमधील हरिद्वार येथील प्रसिद्ध मनसा देवी मंदिरात गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...