मुंबई | Mumbai
स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने (Kunal Kamra) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते शोमध्ये सादर करत अप्रत्यक्ष टीका केली आहे. त्यामुळे याप्रकरणी कामरावर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
दुसरीकडे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी (Shiv Sainiks) आक्रमक होत खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये जाऊन तोडफोड केली. त्यानंतर तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना नेते राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्यासह ४० जणांवर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत मुंबईतील खार पोलीस ठाण्यात (Khar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुर्च्या फेकल्या आणि लाईट्ही फोडल्या
कुणाल कामराने खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये शो घेतला होता. या क्लबमध्ये जाऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालत या क्लबमधील खुर्च्यांची आणि संपूर्ण सेटची तोडफोड केली. तर शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही (Thane) शिवसेनेच्या (Shivsena) समर्थकांनी जोरदार निर्देशने केली. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याबाहेरही शिवसैनिकांनी कुणाल कामराचे फोटो जाळले.
कुणाल कामरा याचं नेमकं गाण काय?
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने आपल्या कवितेत म्हटले की, शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून बाहेर आली. हा प्रकारात सर्वच कन्फूज झाले. हा प्रकार एकाने सुरु केला होता, असे सांगत गाण्याचे बोल सुरु होतात. ‘ठाणे की रिक्षा चेहर पर दाढी, ऑख पर चष्मा….मेरी नजर से देखो तो गद्दार नजर आये….पारिवारिक कलह को खत्म करना चाहते थे। उन्होंने किसी के पिता को चुरा लिया। इसका क्या जवाब होगा? क्या मैं कल तेंडुलकर के बेटे से मिलूं, भाई, चलो डिनर करते हैं। मैं तेंदुलकर की प्रशंसा करता हूं और उनसे कहता हूं, भाई, आज से वे मेरे पिता हैं।